कोकण

जिल्ह्यातील २० विद्यार्थी गुजरात दौऱ्यावर

CD

91202
ओरोस ः येथे विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देताना अधिकारी.


जिल्ह्यातील २० विद्यार्थी गुजरात दौऱ्यावर

अभ्यासासाठी भेटी; राष्ट्रीय आविष्कार अभियान

बांदा, ता. २४ ः समग्र शिक्षाअंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२२-२३ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या २० विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गुजरातमधील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी आयोजित केला आहे. या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे शुभेच्छा देण्यात आल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. २४ ते २९ मार्च या कालावधीत या अभ्यास दौऱ्यात गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा अशा विविध स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. अभ्यास दौऱ्यासाठी प्रगत शाळांमधील अध्ययन निष्पती उत्तम असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये तालुकावार विद्यार्थी असेः देवगड -संस्कृती गुरव (इळये नं. १), पार्थ दहिबावकर (दहिबाब), रिषभ पाळेकर (पाळेकरवाडी नं. १), दोडामार्ग-सानिका गवस (मांगेली नं. १), सूरज नाईक (सासोली नं. १), कणकवली-आदिती रासम (हरकुळ खुर्द), अन्वय शेटये (खारेपाटण नं. १), तपस्या दळवी (हरकुळ खुर्द गावडेवाडी). कुडाळ-सांची पाटेकर (ओरोस बुद्रुक), किरण कदम (पडवे नं. १.), मालवण- चैतन्य भोगले (मसुरे नं. १), प्रज्ञा मेस्त्री (निरवडे). सावंतवाडी-तनिष्का राणे (इन्सुली नं. २), अमोघ वालावलकर (केंद्र शाळा बांदा नं. १), शमिका कदम (कुणकेरी नं. १), वैभववाडी-श्रृती शिंदे (कुंभवडे नं. १), दुर्गेश तावडे (खांबाळे नं. १), वेंगुर्ले-मनाली परब (वजराट नं. १), सार्थक जामदार (वेतोरे नं. १).
--
विद्यार्थ्यांसोबत शिक्षक
खारेपाटण शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रवणकर, बांदा केंद्रशाळा उपशिक्षक जे. डी. पाटील, ओरोस बुद्रुक शाळेच्या शिक्षिका संगीता पाट्येकर हे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी अभ्यासदौरा राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT