बातमी क्र. 27 (टुडे पान 3 साठी)
फोटो ओळी
-rat26p8.jpg- प्रा. नितीन कदम
कुणबी कर्मचारी सेवा संघातर्फे
मंगळवारी करिअर मार्गदर्शन शिबिर
रत्नागिरी, ता. २६ : दहावी-बारावीनंतर काय करायचं, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. दहावी व बारावीनंतर तुम्ही जी शाखा निवडता, यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. त्यासाठी कुणबी कर्मचारी सेवा संघाने मंगळवारी (ता.२८) विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर सकाळी १०.३० वाजता साळवी स्टॉप, नाचणे रोड येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात होणार आहे.
विद्यार्थी आपल्या पसंतीनुसार दहावी-बारावीनंतर कोर्ससाठी प्रवेश घेता. यासाठी करिअर मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते. ज्याद्वारे विद्यार्थ्यांला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत केली जाते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन केले जाते. कुणबी कर्मचारी सेवा संघाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसंदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने शिबिराचे आयोजन केले आहे. दिशा ॲकॅडमी (वाई, बारामती) या संस्थेचे संस्थापक संचालक प्रा. नितीन कदम मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाच्या बदलत्या वाटा यांची माहिती नसते, अशा व इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन, व्याख्याने, शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रा. कदम प्रयत्नशील असतात.
प्रा. कदम यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक मुले शैक्षणिक प्रगती करताना दिसून येत आहेत. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुणबी कर्मचारी सेवा संघाने केले आहे.
...................
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.