कोकण

-मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी प्रबोधनाची गरज

CD

काही सुखद--लोगो

-rat२८p३२.jpg-
९१९५९
रत्नागिरी ः स्वयंसेतू संस्थेतर्फे माधुरी कळंबटे यांचा सन्मान करताना श्रद्धा कळंबटे पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात कश्ती शेख हिचा सत्कार करताना कळंबटे.
-

मुलीच्या जन्माचे स्वागत करा

श्रद्धा कळंबटे ; स्वयंसेतूचा १४ वर्षे उपक्रम ; कर्तृत्वान महिलांचा गौरव

रत्नागिरी, ता. २८ ः स्वयंसेतू सामाजिक संस्थेतर्फे गेली १४ वर्षे मुलीच्या जन्माचे स्वागत हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत समाजात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यात स्वावलंबी, कर्तृत्ववान तरुणी कश्ती शेख आणि झाडांची लायब्ररी सुरू करणाऱ्या माधुरी कळंबटे यांचा सन्मान संस्थेच्या प्रमुख, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी केला.
माधुरी कळंबटे यांनी महाराष्ट्र स्टार्टअप् यात्रेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. अशा महिलांचा देशाला अभिमान आहे. माधुरी कळंबटे यांना दोन कन्या आहेत तसेच नगरपालिकेचे अभियंता यतिराज जाधव यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या मते मुलगी ही लक्ष्मीचे रूप आहे. त्यांना शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. या संदर्भात श्रद्धा कळंबटे म्हणाल्या, २००९ मध्ये जेव्हा सर्वप्रथम हा उपक्रम राबवायला सुरवात केली त्या वेळी दरहजारी मुलांच्या तुलनेत ६४ मुली कमी होत्या. दरवर्षी यात थोडाफार फरक होत होता; परंतु २०२२ च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील हाच फरक आता ६० आहे. याचाच अर्थ गेल्या २४ वर्षांत आपल्याला १ किंवा २ मुलींवर खूष असणारे पालक दिसत असले तरी ६० मुलींची ही दरी कधी भरून निघणार, हा प्रश्न उरतोच. कुठेतरी पाणी मुरतंय हेच खरं.
-
२५०० मुलींचे स्वागत
मुलामुलींच्या संख्येतील दरीमुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या दशकात लग्नासाठी मुली मिळणं दुरापास्त झालं आहे. हे दुष्टचक्र असंच सुरू राहिलं तर याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील. स्वयंसेतूतर्फे आजवर २५०० मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक गाव, शहर, वाडीवस्तीवर हा कार्यक्रम केल्याचे कळंबटे यांनी सांगितले.

कोट
स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या विविध प्रबोधनपर, प्रोत्साहनपर योजनांमुळे का होईना इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील दर हजारी मुलांच्या तुलनेत ० ते ६ वयोगटातील मुलींचे प्रमाण बरं आहे. २०२२ मध्ये मुलींचे प्रमाणे हजार मुलांमागे ९४० होते म्हणजे अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
- श्रद्धा कळंबटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT