कोकण

राजापूर-कोदवलीत जॅकवेल परिसरात वणवा

CD

-rat२८p४२.jpg ः KOP२३L९२००२ राजापूर ः कोदवलीत जॅकवेल परिसरात वणवा लागून नुकसान झाले.
-rat२८p४३.jpg ः KOP२३L९२००३ वणव्यामध्ये पाईपलाईन जळून खाक झाली.
----------------

कोदवलीत जॅकवेल परिसरात वणवा
पाईप, विजेच्या वायर जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प, लाखोंचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः शहरालगतच्या कोदवली गावाला पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेल परिसरात आज सकाळी वणवा लागला. त्यामध्ये नळपाणी योजनेचे पाईप व वीजपुरवठा करणाऱ्‍या केबल जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोदवली गावातील राववाडी, बौद्धवाडी व आगरवाडी या तीन वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेल परिसरात आज सकाळी अचानक वणवा लागला. सकाळी ११ वा.च्या सुमारास याबाबतची माहिती मिळताच या तीनही वाडीतील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बादलीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र ऊन आणि सुकलेला पालापाचोळा, लाकडे यामुळे आगीचा अधिकच भडका उडाला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड बनल्याने येथील तरुण पराग भोसले याने तत्काळ राजापूर पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारी २ वा. पर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत जॅकवेलवरून पाणीपुरवठा करणारे पाईप तसेच वीजपुरवठा करणार्‍या वायर जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच पराग भोसले, नीलेश महाडीक, राजा महाडीक, रितेश उगले, विक्रांत जाधव, अविनाश जाधव यांच्यासह सहकार्‍यांनी सुरवातीलाच जॅकवेलच्या लाईटरूमजवळील आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीमध्ये नळपाणी योजनेच्या वीजवाहिन्या व पाईप जळाल्याने या जॅकवेलवरून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. कोदवली ग्रामपंचायतीच्या सदस्य प्रणोती भोसले व ग्रामसेवकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या आगीत नळपाणी योजनेचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT