कोकण

जिल्हा परिषदेच्या 19 शाळांना आदर्श पुरस्कार

CD

बातमी क्र. ११ (टुडे पान ४ साठी अॅंकर)

जिल्हा परिषदेच्या १९ शाळांना आदर्श पुरस्कार

कीर्तीकिरण पुजार ; संगमेश्‍वरातील एक जादा शाळा

रत्नागिरी, ता. २९ ः शैक्षणिक वर्षामध्ये चांगले काम करणाऱ्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कनिष्ठ विभागातून नऊ आणि वरिष्ठ गटातून १० अशा १९ शाळांना आदर्श पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याची यादी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
शाळांची निवड अधिकाऱ्‍यांनी केली आहे. पदाधिकाऱ्‍यांविनाच ही निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा पातळीवरील निवड समितीची २१ मार्चला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासाठी तालुकास्तरावरून कनिष्ठचे १७ आणि वरिष्ठचे १६ प्रस्ताव आले होते. कनिष्ठ गटातून नऊ आणि वरिष्ठ गटातून १० शाळा पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या आहेत. ही निवड करताना शैक्षणिक वर्षात शाळांनी राबवलेल्या उपक्रमांची पाहणी यामध्ये केली जाते. यंदा सीईओ पुजार यांनी स्वतः काही शाळांची पाहणी केली होती. पुरस्कार देताना शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने राबवलेला एखादा उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी, दाखलपात्र मुले दाखल होण्याची टक्केवारी, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिद्धी या उपक्रमांमधील कामांचा लेखाजोखा घेण्यात आला.
आदर्श शाळा पुरस्कार निवड समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, शिक्षणविस्तार अधिकारी संदेश कडव, प्राचार्य स. रा. देसाई अध्यापक विद्यालय नेताजी कुंभार, बी. संतोष जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रत्येक तालुक्यात एक पुरस्कार दिला जातो; पण वरिष्ठ गटात प्राप्त प्रस्तावात संगमेश्वर तालुक्यातील दोन शाळांचे गुण समान झाले. त्यामुळे दोन शाळांना पुरस्कार विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
तालुका*कनिष्ठ प्राथमिक शाळा*वरिष्ठ प्राथमिक शाळा
------------------------------------------
मंडणगड*लिडे-बौद्धवाडी*प्राथमिक शाळा ढांगर
दापोली*मुंर्डी नं. १*कोळबांद्रे नं. १
खेड*चिंचघर-मेटकर*शाळा नांदवली
चिपळूण*पोसरे नं. २*पोसरे नं. १
गुहागर*जानवळे नं. ३*काजुर्ली नं. २
संगमेश्वर*कोळंबे नं. १*कोडये नं. २
रत्नागिरी* वाटद-कवठेवाडी*गोळप नं. १
लांजा*बेनी बु. गुरववाडी*वाकेड नं. १
राजापूर*प्रा. शाळा बेणगी*चिखलगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT