कोकण

कुडाळात 18 मालमत्ता सील

CD

swt३०२८.jpg
L९२५०३
कुडाळः नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कर थकविणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली.

कुडाळात १८ मालमत्ता सील
नगरपंचायतीची कारवाईः कर वसुली मोहिमेला वेग
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या कारवाई अंतर्गत बुधवारी (ता. २९) प्रशासनाने १८ मालमत्ता सील केल्या. आतापर्यंत शहरातील कर थकीत असलेल्या ११५ मालमत्ता सील करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली. मार्च अखेरची धावपळ सुरू असल्याने कर वसुलीच्या मोहिमेने वेग घेतला आहे.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये मालमत्ताधारकांनी कर थकविल्याने त्यांच्या मालमत्तेवर नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई मोहीम सुरू आहे. १० हजारहून अधिकचा कर थकविणाऱ्या ३०० हून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस पाठविली होती. त्यापैकी कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देत थकीत कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. जप्तीची कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीने जप्ती पथक तैनात केले असून या पथकामार्फत गेले २८ दिवस शहरात मोहीम सुरू आहे. ही कारवाई मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक व जप्ती पथक प्रमुख सहायक कर निरीक्षक रचना कोरगावकर, लिपिक दत्ताराम म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी शैलेश नेवाळकर, रोहित परब, मंदार सावंत, केतन पवार, राकेश केसरकर, प्रवीण कोरगावकर, सतीश जाधव यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

SCROLL FOR NEXT