कोकण

पालीच्या लक्ष्मीपल्लिनाथाच्या चैत्रोत्सवाला प्रारंभ

CD

पान ६ साठी...

पालीच्या लक्ष्मीपल्लिनाथाच्या चैत्रोत्सवाला प्रारंभ

७ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १ ः तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिद्ध पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळ्याला शनिवार (ता. १) पासून सुरुवात झाली. या सोहळ्यानिमित्त ७ एप्रिलपर्यंत दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
चैत्रोत्सवाची सेवा कोल्हापूर येथील गुणे परिवार करत आहेत. उत्सवकाळात दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० पर्यंत वैयक्तिक पूजा, अभिषेक, एकादशनी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदी धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ पर्यंत नैवेद्य, आरती व मंत्रपुष्प, दुपारी १ ते २.३० पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७.३० पर्यंत रूपे लावणे व धुपारती व रात्री ८ ते ९ पर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप असे कार्यक्रम होतील. २ एप्रिलला रात्री ९ ते १०.३० सिद्धयोगी छत्रपती शिवाजी महाराज श्रीमानयोगी (रणजित जोशी) सादरकर्ते सतीश जोशी, १०.३० ते १२ पर्यंत कीर्तन, १२ वाजता पालखी प्रदक्षिणा व छबिना. ३ एप्रिलला रात्री ९ ते १० पर्यंत मराठीतील प्रख्यात विनोदी एकपात्री प्रयोग - सादरकर्ते बंडा जोशी, पुणे, सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १०.३० ते १२ पर्यंत कीर्तन, रात्री १२ ला पालखी प्रदक्षिणा व छबिना असे कार्यक्रम होणार आहेत. ४ एप्रिलला रात्री ९ ते १०.३० पर्यंत नाट्यगीतांचा कार्यक्रम, १०.३० ते १२ पर्यंत कीर्तन, १२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना. ५ एप्रिलला रात्री ९ ते १०.३० पर्यंत जागर मनाचा मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी सहजसुंदर विचारधारा, सादरकर्ते शंतनू गुणे नाशिक, रात्री १०.३० ते १२ पर्यंत कीर्तन, रात्री १२ ला पालखी प्रदक्षिणा व छबिना. ६ एप्रिलला रात्री १० ते १ पर्यंत (लखलख चांदणं) संगीतकार वसंत प्रभू, पी. सावळाराम यांच्या चित्रपटांची सांगीतिक मेजवानी, रात्री १ ते ३.३० पर्यंत पालखी प्रदक्षिणा व छबिना, पहाटे ४ वा. कीर्तनकार हभप विश्वनाथबुवा भाटे यांचे लळिताचे कीर्तन. ७ एप्रिलला रात्री ७.३० वा. ‘श्यामची मम्मी’ नाटक होईल. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.
.......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT