कोकण

देवगडात चौथ्या दिवशी केवळ दोनच उमेदवारी अर्ज

CD

लोगो ः ग्रामपंचायत पोटनिवडणूक
--
देवगडात चौथ्या दिवशी
दोनच उमेदवारांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठीच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवसापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी (ता.२) शेवटची मुदत आहे.
तालुक्यातील कुवळे, हडपीड, मणचे, पडेल, आरे, ठाकूरवाडी, गवाणे, गोवळ, कोटकामते, मुटाट, कातवण, सांडवे, कुणकवण, ओंबळ, पेंढरी, विजयदुर्ग आणि मळेगाव, अशा एकूण १७ ग्रामपंचायतींसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील विजयदुर्ग आणि ठाकूरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. ठाकूरवाडीमध्ये सरपंच आणि एक सदस्य जागा रिक्त आहे. ओंबळ आणि गोवळ या दोन ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन जागा तसेच आणि उर्वरित ठिकाणी एक जागा रिक्त असल्याने एकूण १७ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या १९ सदस्य जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये कोटकामते आणि मुटाट अशा दोन ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT