कोकण

मालवण ''आरसे महल''ला आता नवी झळाळी

CD

00145
मालवण ः येथील शासकीय विश्रामगृह इमारत नूतनीकरणाच्या कामाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली.


आरसे महलला आता झळाळी


मालवणातील इमारत; दोन कोटींचा निधी मंजूर, विश्रामगृह नूतनीकरणासही हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : शहराच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील आरसे महल या इमारतीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या कामास सुरुवात झाली आहे. जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारत नूतनीकरण प्रस्ताव बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविला होता. तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आवश्यक सहकार्य केले. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर करत आवश्यक निधीही दिला आहे. त्यामुळे विश्रामगृह इमारत नूतनीकरणाचे काम सुरू केले असून लवकरच ते पूर्ण होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
आमदार नाईक यांनी नुकतीच नूतनीकरण करण्यात येणाऱ्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरसे महल या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी सातत्याने आमदार नाईक यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्यातून या इमारतीसाठी सुमारे दोन कोटी निधी उपलब्ध झाला असून लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे. शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण झाल्यास प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फायदा होणार आहे. सध्या मालवणात येणाऱ्या अधिकारी, मंत्री अगर आमदार खासदार यांना खासगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे आमदार नाईक यांनी बांधकाममंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. या नूतनीकरणाच्या कामासाठी त्यांनी सुमारे ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली. शासकीय विश्रामगृहाच्या मूळ इमारतीत कोणताही बदल न करता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सीआरझेडच्या नियमांचाही फटका बसणार नाही. जिल्ह्यात ओरोस, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी सुसज्ज शासकीय विश्रामगृहे कार्यरत आहेत. आता आरसे महल या ठिकाणी नवीन इमारत आणि जुन्या विश्रामगृहाचे नूतनीकरण होणार असल्याने मंत्री, आमदारांची गैरसोय थांबणार असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
---
...तर विश्रामगृह व्यवस्थापनाला फायदा
येथील पंचायत समिती विश्रामगृह बंदरजेटी परिसरात असल्याने त्याठिकाणी ही सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी सीआरझेडचा फटका बसत आहे. सीआरझेडमध्ये काही प्रमाणात सूट मिळविता येईल का, याचा अभ्यास करून एक परिपूर्ण आराखडा बनविण्यात येईल. दोन्ही विश्रामगृहातील काही कक्ष पर्यटनासाठी थेट वापरण्यास शासनाने परवानगी दिल्यास त्याचा फायदा विश्रामगृहाचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी होऊ शकणार असून याकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याचेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.
--
लवकरच दोन्ही इमारती
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी या प्रस्तावासाठी आवश्यक पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यासाठी लक्ष दिले आहे. लवकरच येथील शासकीय विश्रामगृह आणि आरसे महल या दोन्ही इमारती दिमाखात उभ्या राहतील, असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT