कोकण

रक्तदान शिबिरास दांडीत प्रतिसाद

CD

रक्तदान शिबिरास दांडीत प्रतिसाद
५५ जणांचे रक्तदानः ग्लोबल रक्तदाते, आतू फर्नांडिस मित्रमंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ : ग्लोबल रक्तकर्ण अंतोन ऊर्फ आतू फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि आतू फर्नांडिस मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आतू फर्नांडिस यांच्या मालवण दांडी हिरवी बत्ती येथील निवासस्थानी हे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आतू फर्नांडिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फर्नांडिस परिवाराला आतू यांच्या स्मरणार्थ ग्लोबल रक्तकर्ण पुरस्कार व शाल अर्पण करून सन्मानित करण्यात आले. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. यात पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्याची संख्या ३० पेक्षा जास्त होती. या शिबिरास ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, राजू जोशी, माजी नगरसेवक पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे यांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या.
या शिबिरासाठी श्री गणेश येशू मंदिर गवंडीवाडा, सिबर्ड दांडी ग्रुप, १०० इडियट्स ग्रुप मालवण यांचे तसेच जिल्हा रक्तपेढीचे डॉ. समाधान धुळगंडे, सिस्टर प्रांजली परब, टेक्निशियन मयुरी शिंदे, नंदकुमार आडकर, उल्हास राणे, नितीन गावकर यांचे सहकार्य लाभले. त्यांना ग्लोबल रक्तदाते परिवाराकडून सन्मानचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, ग्लोबल रक्तदाते परिवारातील विजय पांचाळ, राजू बिडये, फ्रान्सिस फर्नांडिस, दिपक कदम, बबन वाघ, राजा शंकरदास, अमेय देसाई, विकास पांचाळ, संदीप पेडणेकर, सूरज भोसले, नेहा कोळंबकर, राधा केरकर, अंकुश कातवणकर, बाबू डायस यांच्यासह समृद्धी धुरी, कमल बांदकर, लायनेस क्लब अध्यक्षा वैशाली शंकरदास, अनुष्का चव्हाण, पल्लवी तारी, मीना घुर्ये, चेतन हरमलकर, चित्रा हरमलकर, रॉकी फर्नाडीस, राणी पराडकर, पूजा तळाशीलकर, रेनोल्ड बुतेलो, राजा बटाव परिवार, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रतिभा फर्नांडिस, फर्नांडिस कुटुंबीय यांचेही सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT