कोकण

20 लाखाच्या दंडाची थकबाकी

CD

२३ (पान ३ साठी, अॅंकर)


अलिशान मोटारचालकांचा २० लाखांचा दंड थकित

८० जणांकडून १७ लाखांची वसुली; वाहनांवर न्यायालयात खटलेही दाखल

रत्नागिरी, ता. १२ ः अनेकांची मोटार आलिशान असली तरी वाहतूक नियम वारंवार मोडले जातात. गेल्या वर्षभरात वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील ६३० वाहनधारकांविरुद्ध विविध गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यापैकी ८० वाहनचालकांकडून १७ लाख ३९ हजार ५३२ रुपये दंड वसूल करण्यात आला; मात्र आलिशान गाड्या चालवणाऱ्या ५५० कारचालकांकडून अजूनही २० लाख रुपये दंड थकवला गेला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेकडून मिळाली.
जिल्हा वाहतूक शाखेच्या काळ्या यादीत मुळातच अवैध प्रवासी वाहतूक, मद्यपी वाहनचालक आहेतच; परंतु आता आलिशान कारचालकदेखील वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहचालकांवर ई-मशिनद्वारे कारवाई केली जाते. त्यानंतर त्या कारवाईबाबतचा मेसेज संबंधित वाहनमालकाला जातो. त्यानंतर त्यांनी दिलेल्या मुदतीत आकारण्यात आलेला दंड वाहतूक शाखेत भरायचा आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी काहीजणांकडून १७ लाख ३९ हजार दंड वसूल करण्यात आला; १४९ वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. थकबाकी वसुली अजूनही सुरू आहे.
--------------
...तर वाहन जप्ती
पोलिसांच्या काळ्या यादीत असलेली वाहने किंवा मद्यप्राशन करून चालवली जाणारी वाहने जप्त करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले आहेत. अशी वाहने जप्त करून दंड केला जातो. ५५० वाहनचालकांकडे अजूनही २० लाखांची थकबाकी आहे. काहींवर खटले दाखल झाले आहेत.
-
दंड न भरल्यास नोटीस

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाकडून दंड वसूल केला जातो. दंडाची रक्कम मुदतीत न भरल्यास त्याला लोक अदालतीसाठी नोटीस बजावली जाते. लोकअदालतीत त्याला दंडाची रक्कम भरावीच लागते, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT