कोकण

रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद पावसला स्ववास्तूत

CD

सोबत फोटो आहे.
rat१४p१८.jpg-KOP२३M०२८३५ पावस : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या पावस शाखेची अद्ययावत नवी वास्तू.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची
पावस शाखा आजपासून स्ववास्तूत
रत्नागिरी, ता. १४ : महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस येथील शाखा सोमवारपासून (ता. १५) स्व वास्तूमध्ये स्थलांतरित होणार आहे. दिमाखदार वास्तू, अद्ययावत यंत्रणा, उत्तम प्रतिचे आणि आकर्षक फर्निचर असणारी ही वास्तू आहे. ग्राहकांना तत्काळ सर्व सेवा देण्यास तत्पर असणारी पावस शाखा प्रसिद्ध आहे. गेली १९ वर्षे पावस येथे पतसंस्थेची शाखा कार्यरत असून १०० टक्के वसुली आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता शाखेचे उद्घाटन पतसंस्था अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे.
पावस दशक्रोशीमध्ये गेली १९ वर्ष उत्तम व्यवसाय करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने मोठा ग्राहक वर्ग जपला आहे. सध्या ८ हजारांहून अधिक ग्राहक पतसंस्थेशी निगडित आहेत. सर्व जातीधर्मातील लोकांना सहकार चळवळीशी संलग्न करून घेतले आहे. पावस परिसरात विश्वासार्ह सेवा देत ४२ कोटींचा संमिश्र व्यवसाय पावस शाखेने केला. सोनेतारण कर्ज, जामीन कर्ज, आंबा व्यावसायिकांना कर्ज दिली आहेत. कर्जदारही प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करत आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या १७ शाखा आहेत. या पैकी ६ शाखा स्वमालकीच्या जागेत स्थानापन्न झाल्या आहेत. आता त्यात पावस शाखेची भर पडणार आहे. पतसंस्थेच्या नवीन वास्तू उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्राहकही उपस्थित राहणार आहेत. या वेळी काही मान्यवर ग्राहकांचा सन्मान करण्यात येणार आहे. पावस पंचक्रोशीत अर्थकारणाला गती देण्याचे काम स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने केले आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला स्वामींचे आशीर्वाद लाभले आहेत. वास्तू उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक मंडळ, व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, शाखाधिकारी विशाल सावंत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT