Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

उद्यापासूनचं आंदोलन पुढे ढकललं, ८ तारखेची जागा लवकरच जाहीर करणार
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal

अंतरवली : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांना अंतरवली सराटी इथूनच आता उपोषणासाठी विरोध व्हायला लागला आहे. तसंच उद्यापासून त्यांचं उपोषण सुरु होणार होतं, पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. त्यानंतर ८ जून रोजी उपोषण करणार असल्याची त्यांनी जाहीर केलं पण हे उपोषण अंतरवलीत होणार नाही तर इतर ठिकाणी होईल आणि ते लवकरच जाहीर केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. (Manoj Jarange maratha reservation hunger strike now opposed by citizens of Antarvali village)

Manoj Jarange Patil
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

काय म्हणाले जरांगे?

फेसबुक लाईव्हद्वारे मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरु करणाऱ्या उपोषणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, आपण उद्या ४ जूनला अंतरवालीत आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं, ते आता पुढं झकलेलं आहे. त्यामुळं अंतरवलीत एकाही मराठी बांधवानं येऊ नये. तसंच हेच उपोषण ८ जूनला अंतरवालीत करायचं ठरवलं होतं, पण आता या गावात आमरण उपोषण करण्यासाठी आपलं मन लागत नाही.

गाव चांगल आहे, पण त्यांचं गाव आपल्यामुळं अडचणीत येत आहे, असं इथल्या नाकरिकांचं म्हणणं आहे. गाव अडचणीत येऊ नये, गावचे लोक अडचणीत येऊ नयेत, अशी आपली भावना आहे. त्यामुळं ८ जूनला आमरण उपोषण कुठे करायचं? हे मी मराठा समाजाला विचारून तुम्हाला सांगेल, अशी माझी आत्ताची भावना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil
Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

एखाद्यानं हे आंदोलन चिरडण्याचं जर षडयंत्र रचलंच असेल तर गाव अडचणीत आणण्याचं काम केलं जातं. अंतरवली गाव मला अडचणीत आणायचं नाही. इथं लोक आता गावात जातीयसलोखा राहिला नाही असं म्हणत आहेत. आता मराठ्यांनीच मराठ्यांना हारवायचं ठरवलं तर ते काहीही घडवून आणू शकतील. त्यामुळं या गावात आंदोलन नको, पण मी हटणार नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आंदोलन कुठे आणि कधी करायचं? हे ठरवेन, असंही यावेळी जरांगे यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com