कोकण

नमन, जाकडी लोककलांना राजाश्रय मिळणार

CD

२० (टुडे पान ३ साठी)

नमन, जाकडी लोककलांना राजाश्रय मिळणार

आमदार निकमांच्या प्रयत्नाला यश ; मुनगंटीवार सकारात्मक

चिपळूण, ता. १८ ः आमदार शेखर निकम यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाकडी लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून, लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
कोकणातील दशावतार वगळता नमन, जाकडी अशा महत्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाकडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाकडी मंडळांना अनुदान मिळत नाही, कलाकारांना कसल्याही प्रकारच्या सुविधा अथवा मानधन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा कोकणच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुनंगटीवार यांनी आमदार निकम यांना १५ मे च्या पत्राने या विषायासंदर्भात उत्तर दिले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव यांच्याकडे आपण हा विषय कार्यवाहीसाठी पाठवल्याने मुनगंटीवार यांनी कळवले आहे तसेच या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले आहे. आमदार निकम यांच्या प्रयत्नामुळे कोकणातील नमन, जाकडी लोककलांना अनुदान, राजाश्रय मिळवण्याचा, कलकारांना सुविधा मिळण्याचा मार्ग आता खऱ्या अर्थाने दिसू लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT