कोकण

घोंगडी बैठकांमधून कृषी योजनांचा प्रसार

CD

९ (टुडे पान १ साठी)


-rat१८p१४.jpg-
२३M०३५४३
डोर्ले (ता. रत्नागिरी) ः डोर्लेतील शेतकऱ्यांना माहिती देताना कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर राऊत.
--

घोंगडी बैठकांमधून कृषी योजनांचा प्रसार

पावस पंचक्रोशी ; कृषी विभागाचा विधायक उपक्रम

पावस, ता. १८ ः कृषी विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना सखोल माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी शेतीत करावी यासाठी कृषी विभागाने रत्नागिरी तालुक्यातील पावस पंचक्रोशीत घोंगडी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. या बैठकांमधून शेतकऱ्यांना जनजागृती आणि योजनांचा प्रसार केला जात आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्यावतीने विविध ठिकाणी या बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये कृषी विभागाचे कृषी सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देत आहेत. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांना रात्री एकत्र समुहाने १०, २०, ३० असे गट करून माहिती दिली जाते. कृषी विभागातील १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भातबियाणे बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता तपासणी, कृषी यांत्रिकीकरण योजना, चारसुत्री भातलागवड पद्धत, घरचे बियाणे वापर, नॅनो युरिया वापर, गादीवाफा पद्धतीने भातलावणी, आंबा पुनर्जीवन योजना, भातलावणी ते कापणीपर्यंत सखोल माहिती दिली जात आहे. शेतकऱ्याच्या घरी जाऊन ही माहिती दिली जात असल्याने शेतकरीही आनंदित आहेत.
कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर राऊत म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याने कृषी विभागाच्या योजना योग्य तऱ्हेने राबवून आपली आर्थिक उन्नती साधण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. शहरात न जाता या योजनेच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधणे काळाची गरज आहे. कृषी विभागाच्या योजना समजावून घेऊन त्या राबवण्याकडे विशेष कल असला पाहिजे. आपोआप आपल्या क्षेत्राचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास उत्पन्नाचे साधन बनू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT