कोकण

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी गप्पी मासे पाळा

CD

swt1912.jpg
03833
डिंगणेः येथे मार्गदर्शन करताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखविताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्रे - निलेश मोरजकर)

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी गप्पी मासे पाळा
डॉ. रमेश कर्तसकरः डिंगणेत जनजागृतीपर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ः डासांची उत्पत्ती व वाढ रोखण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करुन परीसराची स्वच्छता राखावी तसेच गप्पी मासे हे डासांची अळी खाऊन नष्ट करत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणवठ्यात या माशांचे जतन करावे. पावसाळ्यात डेंग्यूची साथ रोखण्यासाठी जनजागृतीतून व कृतीतून या आजाराला प्रतिबंध करूया, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी डिंगणे येथे केले.
डिंगणे ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस निमित्त जिल्हास्तरीय किटकजन्य आजार जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कर्तस्कर बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, सरपंच संजय डिंगणेकर, आरोग्य सहाय्यक रमेश परब, सुभाष सांवत, कीटक समाहाराक सागर किनळेकर, आरोग्य सेवक साईस्वरुप देसाई, आरोग्य सेविका प्रेमा कदम, समुदाय आरोग्य अधिकारी अमोल खिलारी, माजी उपसरपंच जयेश सावंत, ग्रामपंचायत सदस्या शैला नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. कर्तस्कर यांनी डासांमार्फत होणारे किटकजन्य आजार कसे रोखता येतील, याबाबत लोकांना मार्गदर्शन केले. आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करुन गावांमध्ये डासांची उप्तत्ती व वाढ रोखण्याकरीता काम केले जाते. घराशेजारी पाणीसाठे हौद डबकी टायर यामध्ये पावसाळयात पाणी साचून डासांची वाढ होते, यामुळे या पाणी साठयांची योग्य विल्हेवाट लावून परीसर स्वच्छता राखून डासांची उत्पत्ती थांबविता येते. आजाराच्या उपचाराआधी आजाराचा प्रतीबंध करुया, असे सर्व ग्रामस्थांना आव्हान करण्यात आले. यावेळी गप्पी माशांचे महत्व लोकांना सांगण्यात आले व उपस्थित लोकांना गप्पी माशांद्वारे डासाची अळी कशी खावून नष्ट केली जातात याचे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ या कार्यशाळेला उपस्थित होते. सरपंच संजय डिंगणेकर यांनी या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे कौतुक करत ग्रामपंचायत डिंगणे व बाजुच्या गावांमध्ये डासांमार्फत होणाऱ्या किटकजन्य आजार लोकसहभागातून नक्कीच कमी होतील, असे ग्रामस्थांमार्फत उपस्थित अधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबला पहिला धक्का, चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या ग्लिसनला मिळाली पहिली विकेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT