कोकण

मोरजकर माय-लेकाचे ''बुधभूषण'' स्पर्धेत यश

CD

फोटोसंक्षिप्त


४५३८
४५३९
मोरजकर माय-लेकाचे
बुधभूषण’ स्पर्धेत यश
बांदा ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवसंस्कार’च्या वतीने आयोजित ‘बुधभूषण’ या राज्यस्तरीय स्पर्धेत येथील सौ. रीना मोरजकर यांनी खुल्या गटात पहिला, तर नैतिक मोरजकर याने शालेय गटात द्वितीय क्रमांक मिळविला. मोरजकर मायलेकराच्या यशाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी देखील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण यश मिळविले आहे.
स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा व कर्नाटक राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज रचित ''बुधभूषण'' या ग्रंथातील कुठलाही एक श्लोक व त्याचा मराठीत अनुवाद असा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत खुल्या गटात रीना मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर शालेय गटात नैतिक मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर 1) याने द्वितीय क्रमांक मिळविला. वेशभूषा स्पर्धेत नैतिक याने चतुर्थ क्रमांक मिळविला. मोरजकर मायलेकराच्या यशाने बांदा शहरातून अभिनंदन होत आहे.


बांदा विकास सोसायटीचा
उद्या उद्‍घाटन सोहळा
बांदा ः बांदा विकास सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. 25) सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, श्रीपाद अळवणी यांच्या हस्ते संस्थेचे माजी अध्यक्ष सावळाराम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक विद्याधर परब, गजानन तावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी संचालक प्रमोद कामत, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सहकारी संस्था सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, सहकारी संस्था सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, बांदा माजी सरपंच अक्रम खान, शेर्ले माजी सरपंच जगन्नाथ धुरी, डिंगणे माजी सरपंच स्मिता नाईक आदी मान्यवर उपस्थित आहेत. संस्थेच्या सर्व सभासद व सहकारप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष घनःश्याम बांदेकर, उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, सचिव मयुरी परब यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT