कोकण

चिपळूण ःज्यांना निवडून दिले, त्यांनी गाळ निर्माण केला

CD

ratchl231.jpg-
M04526
चिपळूणः जनसेवक पुरस्कार स्वीकारताना पत्रकार सुभाष कदम.
---
ज्यांना निवडून दिले त्यांनी निर्माण केला गाळ

आमदार पाटीलः नाथ पै, दंडवते कोकण विकासाचे शिल्पकार

चिपळूण, ता. २५ ःकोकणचा खऱ्या अर्थाने विकास हा बॅ. नाथ पै, जॉर्ज फर्नांडीस व प्रा. मधू दंडवते यांनी केला. कोकणच्या विकासाचे शिल्पकार हे तिघे आहेत. येथे आमदार, खासदार मंत्री, मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी कोकणाला व येथील जनतेला काय दिले. ज्यांना निवडून दिले त्यांनी गाळ निर्माण केला. कोकणच्या विकासाला चालना देताना स्थानिकांना तसेच येथील साधन संपत्तीला जपा, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दल (यु.) चे महासचिव, आमदार कपिल पाटील यांनी येथे केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक-भवन येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी जनता दल (युनाइटेड) चे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते जनसेवक पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी मुख्य संयोजक प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी प्रास्ताविकात कोकणातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. आमदार पाटील म्हणाले, भाकरी करपायला लागली आहे. ज्यांना आपण निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींनी कोकणचा विकास केला असता तर येथील माणसं बाहेर गेली नसती. देशात नव्वदच्या दशकात समाजवादाला, लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम सुरू झाले. सध्या खासगीकरणाला प्राधान्य देण्यात येत असून सर्वच क्षेत्रात कंत्राटीकरण सुरू आहे. या विरोधात देशातील सर्वच विरोधकांनी एकत्र यायला हवे. या देशात सध्या हुकुमशाह सरकार आहे. देव आणि धर्मात लढायला शिकविणारे आमच्या संस्कृतीशी, भावनांशी व परंपरेशी खेळणारे हे सरकार हद्दपार करायला हवे.

या वेळी कुणबी समाजाचे युवानेते संतोष कुळे, अनिल कलकुटकी, पत्रकार सुभाष कदम, स्मृती राणे, किशोर कदम, अनिल शिंदे, प्रकाश साळवी, शशिकात मोदी, करामत मिठागरी, सीमा रानडे, फैरोझा मोडक, विलास कांबळे, योगेश पवार, गीता चिंगळे, गीता बने, विकास गमरे, प्रकाश चिपळूणकर, उस्मान सय्यद, संदीप जाबरे,कासम दलवाई आदींचा जनसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT