कोकण

चिपळूण-ओल्या गाळ रस्त्यावर, आठ दुचाकीस्वार आडवे

CD

ratchl247.jpg-
04755
चिपळूणः ओल्या गाळामुळे रस्त्यावरून घसरलेल्या दुचाकी.
ratchl248.jpg
04756
ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्याधिकारी.
ratchl249.jpg
04757
ठप्प झालेली गाळ काढणारी यंत्रणा.
ratchl2410.jpg
04754
गोवळकोट येथे पाण्यातून काढण्यात येणारा गाळ.
-------------------

वाशिष्ठी गाळ उपसा--लोगो

ओला गाळ रस्त्यावर, आठ दुचाकीस्वार आडवे

काम रोखले ; गाळ उपशाचे काम नामने थांबवले
चिपळूण, ता. २४ः लोकवर्गणी न घेता दिवसाला लाखोंचा खर्च करून नाम फाऊंडेशनच्यावतीने वाशिष्ठी नदीत गोवळकोट येथे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. ओला गाळ रस्त्यावर साडल्याने या मार्गावरून वाहतूक करणारे सात ते आठ दुचाकीस्वार घसरून पडले. या रागातून दुचाकी वाहनचालकांसह काही ग्रामस्थांनी गाळ काढण्याचे रोखले. ग्रामस्थांचे असहकार्य मिळत असल्याने नाम फाऊंडेशनने गोवळकोट येथील गाळ उपशाचे काम थांबवले आहे. तसेच पत्र प्रांताधिकाऱ्यांना दिले. दरम्यान गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी पालिकेकडून नाम फाऊंडेशनशी चर्चा सुरू आहे.
मंगळवारी (ता. २३) सकाळी गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर निघणारा गाळ हा ओला असल्याने तो रस्त्याने सांडत होता. त्यामुळे गोवळकोटच्या रस्त्याला सात ते आठ वाहनचालक घसरून पडले. याचा राग मनात धरून ग्रामस्थांनी गाळ काढण्याचे काम रोखलं. यापूर्वीही नाम फाउंडेशनच्या पोकलेन चालकाला गोवळकोट धक्क्यावर दमदाटी करण्यात आली होती. तशी तक्रार ही चिपळूणच्या पोलिस दिली होती. दरम्यान ग्रामस्थांनी गाळ काढण्याचे काम रोखल्याची माहिती पालकमंत्र्यांना मिळाली. त्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना सूचना केल्या. त्यानुसार मुख्याधिकारी शिंगटे व प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी घटनास्थळी सायंकाळी गोवळकोटला पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांची तक्रार जाणून घेतली. चिपळूणकरांसाठी चाललेल्या या कामात नागरिकांनी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. या कामावर देखरेख करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचा एक सुपरवायझरही नेमला. मात्र ग्रामस्थांचे असहकार्य होत असल्याने नामने प्रांताधिकाऱ्यांना पत्र देत काम थांबवत असल्याचे कळवले.
---------
कोट
वाशिष्ठी नदीतील मोठ्या गाळ काढून शहर पुरमुक्त करण्यासाठी चिपळूण बचाव समितीची धडपड सुरू आहे. समितीच्या विनंतीनुसार नाम फाउंडेशन चिपळूणकरांच्या मदतीला धावून आले. शहरात चालणाऱ्या नाम फाउंडेशनच्या गाळ काढण्याच्या कामाला अनेक ठिकाणी विरोध झाला. शासनाने पाठ फिरवल्यानंतर चिपळूणकरांच्या मदतीला धावणाऱ्या नाम या सामाजिक संस्थेला आपण सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे.
- महेंद्र कासेकर, समन्वयक, नाम फाउंडेशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT