कोकण

‘शिक्षक भरतीसह इतर मागण्यांची पूर्तता करा’

CD

‘शिक्षक भरतीसह इतर
मागण्यांची पूर्तता करा’

‘सत्‍यशोधक’चा कणकवलीत उद्या मोर्चा

कणकवली, ता. ६ : शिक्षक भरतीसह विविध मागण्यांसाठी सत्‍यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे ८ जून रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेअकराला हा मोर्चा निघणार असल्‍याची माहिती सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुजय जाधव यांनी दिली.
याबाबत सत्‍यशोधक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्‍हटले की, बदली प्रक्रियेनंतर सिंधुदुर्गातील १२१ शाळा शिक्षकांविना रिक्‍त राहणार आहेत. या शाळांमध्ये तातडीने शिक्षक भरती करण्यात यावी. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या एस.सी, एस.टी, ओबीसी, एन.टी. आदी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सरकारच्या निर्देशानुसार कोणतीही फी घेऊ नये, असे आदेश जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत. तसेच जी महाविद्यालये बेकायदेशीर फी घेतील त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. ८ जून रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये सत्‍यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश पेडणेकर, सचिव शंकर जाधव तसेच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिकेत तांबे, सचिव निलीमा जाधव आदी उपस्थित राहणार असल्‍याची माहिती तालुकाध्यक्ष सुजय जाधव, सचिव दिक्षा कांबळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT