कोकण

सीईओंनी केले मुलांचे स्वागत

CD

१३ (टूडे पान ३ साठी, संक्षिप्त)


-rat१६p२५.jpg-
२३M०९७७४
पावस (ता. रत्नागिरी) ः पावस शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना सीईओ कीर्तीकिरण पुजार आणि शिक्षक.
---------------

पावस शाळेत सीईओंनी केले मुलांचे स्वागत

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पावस नं. एक शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव व पहिलीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तक वितरण व गणवेश वाटप हस्ते करण्यात आले. शाळा सुंदर पानाफुलांच्या रांगोळ्या काढून सजवण्यात आली. ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे औक्षण करून त्यांना पुष्प देण्यात आले. या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, एपीओ शिक्षण कांबळे, रत्नागिरी गटविकास अधिकारी ए. पी. जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, पावस गावच्या सरपंच चेतना सामंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरव आदी उपस्थित होते.
------
बियाणी बालमंदिरमध्ये लहान मुलांचे स्वागत

रत्नागिरी ः भारत शिक्षण मंडळ संचलित गो. भ. बियाणी बालमंदिरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी बालकांचे औक्षण करून छोट्या बाल दोस्तांचे स्वागत केले. बालकांचे स्वागत करण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत घवाळी, प्रबंधक विनायक हातखंबकर, संजय चव्हाण, संतोष कुष्टे, श्रीकृष्ण दळी आदी उपस्थित होते.
पालक बंधू-भगिनी, आजी-आजोबा, कर्मचाऱ्यांनी बालवाडीतील चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व बालदोस्तांनी नाविन्यपूर्ण खेळाचा भरभरून आनंद घेतला. शाळा बालकांच्या किलबिलाटाने गजबजून गेली.
--------

कसबा हायस्कूलच्या मुआजचे नीट परीक्षेत यश

संगमेश्वर ः संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयाच्या कुमार मुआज रईस शेख या विद्यार्थ्याने NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेत ५८४ गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. त्याला एमबीबीएससाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कसबा हायस्कूलमधून मुआजने सेमीमधून शिक्षण घेऊन १० वी आणि १२वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न करून कोणतेही स्पेशल क्लास न लावता नीटमध्ये हे यश संपादन केल्याने पंचक्रोशीतील मुलांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षक वडील व आईची प्रेरणा, शाळा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुआजने स्वमेहनतीने यश मिळवल्याचे विशेष कौतुक होत आहे. शांत, संयमी व भरपूर कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर कठीण आव्हान पेलता येऊ शकते, हे त्याने पुन्हा सिद्ध केले आहे. मुआजचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशासाठी संस्थेचे अध्यक्ष कॅ. अकबरसाहेब खलपे, उपाध्यक्ष नियाजसाहेब कापडी, उपाध्यक्ष इब्राहिमसाहेब काझी, सचिव सईदसाहेब उपाद्ये यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---

-rat१६p७.jpg ः
२३M०९७२१
लांजा ः लांजा शाळा नं. पाच मध्ये नवागत विद्यार्थ्यांचे वृक्ष देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
------------
लांजा शाळेतील विद्यार्थ्यांना दिली रोपे

लांजा ः लांजा शाळा नं. पाचमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुरुवारी (ता. १५) शाळेच्या पहिल्या दिवशी ढोलताशांच्या गजरात आणि वृक्ष देऊन त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. लांजा शाळा नं. ५ मध्ये पहिलीत दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे दरवर्षी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले जाते. ढोलताशांच्या गजरात आणि त्यांचे औक्षण करून तसेच प्रत्येक नवागत विद्यार्थ्याला एक रोप देऊन वृक्ष लागवडीचा संदेशदेखील देण्यात आला. ही झाडे लांजा वनविभागामार्फत घेण्यात आली होती. कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी बंडगर, वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक सूरज तेली, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

SCROLL FOR NEXT