Konkan Birds
Konkan Birds esakal
कोकण

Konkan Birds : बुलबुलने दिला एकाच घरट्यात दोनदा पिलांना जन्म; उन्हाच्या कडाक्यात फुलवला संसार

सकाळ डिजिटल टीम

रानातून काजू, आंबा, करवंद, जांभूळ, अळू असा जंगली रानमेवा तयार झाला असून, परिसरात अनेक पक्षी मनसोक्त बागडत आहेत.

मंडणगड : करवंदाची जाळी, खैरासारख्या काटेरी तसेच घराशेजारी असलेल्या फूलझाडांवर पक्ष्यांनी आपले संसार फुलवले आहेत. घरट्यातून पिलांचा जन्मोत्सवही सुरू आहे. कोकणात सध्या विविध पक्ष्यांचा (Konkan Birds) विणीचा हंगाम सुरू झालेला आहे. भिंगळोली येथील समीर कदम यांच्या घराच्या ओटीवर विजेच्या बोर्डवर बांधलेल्या घरट्यात बुलबुल पक्ष्याने (Indian Nightingales) दोनवेळा अंडी घालून पिलांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.

जंगलातच नव्हे तर घराशेजारी असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहेत. पक्षीप्रेमींना त्यामुळे अभ्यासाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मार्च ते मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढतो. या कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक पक्षी (Bulbul Bird) आपली घरटी बांधतात. एप्रिल, मे महिना हा काही पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. सध्या रानात करवंदाच्या जाळी हिरव्यागार झाल्या असून, त्यावर काळी मैना तयार होऊ लागली आहे.

अशा झुडपांत मिळणाऱ्या सावलीत पक्ष्यांनी आपली घरटी बांधून आपले संसार उभे केले आहेत; मात्र पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेकवेळा कोणत्यातरी घटनेची शिकार होतात. अन्य वन्यप्राणी, मोठे पक्षी यांच्याकडून घरट्यातील अंडी, पिले खाण्याच्या घटना घडतात. वादळी वाऱ्यामुळे घरटी कोसळतात. मानवी कृतीचा फटकाही मोठ्या प्रमाणात बसतो. पशू-पक्ष्यांकडे अधिक सहृदयता असते. माणसाने किंवा झाडाने त्यांच्यावर प्रेम केले तर त्याची जाण ते ठेवतात. मोजक्याच घरट्यातून पिलांचा जन्मोत्सव यशस्वीही होतो.

रानातून काजू, आंबा, करवंद, जांभूळ, अळू असा जंगली रानमेवा तयार झाला असून, परिसरात अनेक पक्षी मनसोक्त बागडत आहेत. सध्या त्यांचा विणीचा काळ सुरू असून, काही घरट्यातून अंडी तर काहीतून पिले मोठी होत आहेत. एखाद्या घरट्यात पिलांची यशस्वी वाढवणूक सुरक्षितपणे झाली तर पक्षीही पुन्हा त्याच घरट्यात अंडी घालतात, असे चित्र पाहायला मिळाले आहे.

ओटीवर घरातील माणसांचा सारखा वावर असूनही बुलबुल पक्ष्याने घरटे बांधले; मात्र तिला कोणताही त्रास किंवा असुरक्षित वाटेल असे काहीच न केल्याने तिने या घरट्यात एकदा नव्हे, तर दोनदा पिलांना जन्म देऊन यशस्वी भरारी घेतली आहे.

-समीर कदम, मंडणगड

बुलबुल, नवरंग, वटवट्या पक्ष्यांचे दर्शन

पिले आढळणारी घरटी ही बुलबुल, वटवट्या पक्ष्यांची आहेत तसेच नवरंग, कृष्ण थिरथिरा, भारिट, खंड्या, भुरळी, हळद्या, मोर, चष्मेवाला, दुर्लव असे अनेक पक्षी दृष्टीस पडतात. या परिसरात त्यांचा आवाजही कानी पडतो. ग्रामीण भागात या पक्ष्यांना वेगवेगळ्या नावानेही ओळखले जाते. विविध प्रकारचे कीटक, कीडे, मुंग्या पकडून आपल्या पिलांच्या चोचीत भरवताना त्यांचे कसब पाहणे मनाला आनंद देणारे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT