कोकण

रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती

CD

पान ५

७८४८०
रामपूरमध्ये पथनाट्यातून मतदान जनजागृती
चिपळूण : तालुक्यातील रामपूर प्रभागातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या शिक्षकांनी पथनाट्यातून मतदान जनजागृती करून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मार्गताम्हाणे बाजारपेठ, चिवेलीफाटा येथे हा कार्यक्रम शिक्षकांनी सादर केला. या वेळी शिक्षक राष्ट्रपाल सावंत यांनी मतदान जनजागृतीपर गीत सादर केले. त्यांना इतर शिक्षकांनी दाद दिली. यानंतर शिक्षिका प्रांजली चव्हाण यांनी पथनाट्यातून मतदानाचे महत्व सांगून देशाप्रती असलेली देशभक्ती व लोकशाहीबद्दलची भावना व्यक्त केली.

वेदांत जाधव शिष्यवृत्तीसाठी पात्र
खेड ः तालुक्यातील मुरडे येथील कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आठवीमध्ये शिकणाऱ्या वेदांत जाधव याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. वेदांतच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे, अमित कदम, तांबट, पाटील, शिगवण, हिलम, पवार व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

दापोलीत महिलांच्या योग स्पर्धा
दाभोळ ः दापोलीत खुल्या गटातील महिलांच्या योग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. दोन गटात आयोजित या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे अध्यापक विश्वास फाटक, योगतज्ञ विश्वेश चिखले तसेच योग विद्याधाम खेडच्या अध्यापिका सुनीता जोशी उपस्थित होत्या.

वाकवली-टेटवली रस्त्याचे काम दर्जाहीन
दाभोळ ः दापोली तालुक्यातील वाकवली टेटवलीमार्गे गावतळे या मार्गावर होत असलेल्या डांबरीकरणाचे काम दर्जेदार नाही, अशी चर्चा वाहनचालक व प्रवाशांमधून सुरू आहे. रस्त्याचे मजबुतीकरण करून सुमारे ३ महिने उलटून गेले तरी कार्पेट आणि सीलकोट केलेले नाही. मजबुतीकरण केलेल्या या रस्त्यावरील खडी उखडू लागल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम करत असताना डांबर योग्य प्रमाणात न वापरल्याने रस्त्यातील खडी बाहेर येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT