Sheel Dam
Sheel Dam esakal
कोकण

Sheel Dam : शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; रत्नागिरीतील दुर्दैवी घटना

सकाळ डिजिटल टीम

उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तनिष्क, स्मित हे दोघेही संपूर्ण गावाला परिचित होते.

रत्नागिरी : शीळ धरणाच्या (Sheel Dam) नदीपात्राच्या मुखाजवळ पोहण्यासाठी गेलेल्या फणसवळे आंबेकर कोंडवाडीतील दोन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाला. काल (सोमवार) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली. दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. चिमुरड्यांच्‍या मृत्यूमुळे दोघांच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात (Ratnagiri Hospital) हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या.

तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८), स्मित वासुदेव आंबेकर (वय ७) हा अशी मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. तनिष्क दुसरीला तर स्मित अंगणवाडीत (Anganwadi) होता. दोघे दुपारी वाडीत खेळत होते. दुपारची वेळ असल्याने वाडीत फारशी रहदारी नव्हती. दोघांनीही गावातील दुकानात खाऊ घेतला. त्यानंतर ते दोघेही थेट शीळ नदीच्या पात्रात पोहण्यास गेले. दोघांनीही पाण्यात उड्या मारल्या; परंतु धरणपात्रात चिखल असल्याने ते अडकले.

बाराच्या सुमारास धरणपात्रात उतरलेली मुले गावातील काही व्यक्तींनी पाहिली; परंतु ती बराच वेळ झाली तरी पोहताना दिसत नसल्याने काही ग्रामस्थांनी याची माहिती वाडीतील ग्रामस्थांना दिली. त्यानंतर आई-वडिलांसह नातेवाईक, ग्रामस्थ यांनी धरणपात्राकडे धाव घेतली. नीलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी पाण्यात उड्या मारत दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक मुलगा सापडला.

त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. तासाच्या फरकाने दुसरा मुलगा त्याच ठिकाणी आढळून आला. त्यालाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तनिष्क, स्मित हे दोघेही संपूर्ण गावाला परिचित होते. ते बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अख्खा फणसवळे गाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलिस हवालदार विनोद भितळे व टीमने प्रथम घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊन मृतदेहांची पाहणी केली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

चित्रकलेच्या सरावासाठी शाळेत जातो...

घरातून जाताना दोघेही चित्रकलेच्या सरावासाठी शाळेत जातो, असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, या घटनेनंतर दोघांचेही दप्तर तपासले तर त्यांच्या दप्तरामध्ये कपडेच होते. चित्रकलेचे कोणतेही साहित्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT