Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabhaesakal

राणे-राऊत यांच्यातच रंगणार काटाजोड लढत; रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 'इतके' उमेदवार रिंगणात

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दोन अर्ज तसेच अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला.
Summary

अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी ९ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्वच उमेदवार आता रिंगणात कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ९ उमेदवार रिंगणात आहेत. मतदार संघासाठी ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले होते. ते सर्वच्या सर्व अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्‍या छाननीनंतर वैध ठरले. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी ९ पैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने हे सर्वच उमेदवार आता रिंगणात कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; दोन्ही मतदारसंघातून 'इतक्या' जणांनी घेतली माघार

लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut), महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane), बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे, सैनिक समाज पक्षाचे सुरेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे मारुतीकाका जोशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार आणि शकील सावंत, अमृत तांबडे, विनायक लहू राऊत हे तीन अपक्ष असे मिळून एकूण ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी चार अर्ज तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दोन अर्ज तसेच अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. काल सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती; परंतु या उमेदवारांपैकी कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात हे नऊही उमेदवार राहणार आहेत.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचविण्यासाठी 'हाता'ला साथ द्या; शाहू महाराजांचं मतदारांना आवाहन

अपक्ष राऊतांना चिमणी; सावंतांना मिळाला माईक

राजेंद्र लहू आयरे (बहुजन समाज पार्टी) हत्ती, नारायण तातू राणे (भारतीय जनता पार्टी) कमळ, विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल, अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी) खाट, मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी) प्रेशर कुकर, सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पार्टी) शिट्टी, तांबडे अमृत अनंत (अपक्ष) पेनाची निब सात किरणांसह, विनायक लवू राऊत (अपक्ष) चिमणी, शकील सावंत (अपक्ष) माईक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com