कोकण

४०० खासदारांमध्ये नारायण राणे, हा माझा शब्द

CD

१२ ( पान ३ साठी )

चारशे खासदारांमध्ये राणे असणारच

उदय सामंत ः ठाकरेंच्या जाहीरनाम्यात माझ्या खात्याचा उल्लेख

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यात माझ्या खात्याचा उल्लेख केलाय. लोटे परशुराममध्ये कोकाकोला प्रकल्प सुरू झाला त्याचे खरे प्रणेते देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ३ हजार कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात आली. उद्योजक परराज्यात गेले ते पाप उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे आहे. समोरच्याकडे विकासात्मक सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे ४०० खासदारांमध्ये नारायण राणे हे सुद्धा असतील हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
महायुतीच्यावतीने राजापूर राजीव गांधी मैदान येथे प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी उदय सामंत म्हणाले, पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करतो. देशाचे पंतप्रधान यांनी ४०० पारचा नारा दिला आहे. नारायण राणे सुद्धा यामध्ये खासदार असतील, हा माझा शब्द आहे. कोकणच्यादृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. अनेक विकासाची कामे राणे यांनी केली आहेत. फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री असताना कोकणाला चांगला न्याय दिला. येत्या वर्षात रत्नागिरीच्या विमानतळावरून विमान टेकऑफ घेणार आहे. आपण सुरू केलेल्या अनेक योजना कोकणवासियांनी स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की, ही निवडणूक आपण स्वतःची समजून प्रचार करावा. समोरच्याकडे विकासात्मक सांगण्यासारखे काही नाही. २ जाहीरनामे तयार झाले. ४ तारखेच्या मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत.
महाराष्ट्र शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असताना परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात एक नंबरला आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांनी पाठपुरावा केला. चेन्नईला चाललेला प्रकल्प महाराष्ट्रात आणत आहोत आणि ८ हजार लोकांना आम्ही रोजगार देणार आहोत. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. मला खात्री आहे, सगळ्यांच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून येतील. फार मोठ्या मताधिक्याने राणे निवडून येतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT