कोकण

स्टॅंपपेपरवर मतदारांना बहुजन मुक्ती पार्टीची हमी

CD

३१ (पान ५ साठी)

rat२६p१५.jpg-
P२४M७९९३४
अशोक पवार

कॉंग्रेस,भाजपने बहुजनांना गुलाम बनवले

अशोक पवार ः स्टॅंपपेपरवर बहुजन मुक्ती पार्टीची हमी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : मूलनिवासी बहुजन समाजाला काँग्रेस व भाजपने गुलाम बनवले आहे. या दोन्ही पक्षांची शासनव्यवस्था एकमेकांच्या समन्वयाने सत्ता व राज्यसरकार कारभारावर नियंत्रण ठेवणारी आहे. आजही बहुजन समाज त्यांच्याकडे हक्क मागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा, असे आवाहन करत बहुजन मुक्ती पार्टीचा प्रचार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सुरू आहे. १०० रुपयांच्या स्टॅंपपेपरवर बहुजन मुक्ती पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी दिली.
पवार यांनी सांगितले, आमचा प्रचार धीम्या गतीने सुरू आहे. आमचे जास्त कार्यकर्ते प्रचारयंत्रणा राबवत आहेत. हा मतदार संघ तसा खूपच मोठा आहे; परंतु आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. सुमारे २५ ते ३० हजार मते आम्हाला मिळतील, असा अंदाज आहे.
बहुजन मुक्ती पार्टीने जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे घेतले आहेत. उच्चस्तरीय शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना, ग्रामीण भागात ७५ टक्के जागा राखीव व त्यातील ५० टक्के जागा एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांकांसाठी राखीव असतील. माहितीचा अधिकार कायदा अधिक बळकट करू. उच्च शिक्षणासाठी बॅंकेकडून कर्जाची हमी देऊ. कृषी, आरोग्य, अत्याचार प्रतिबंधक धोरण जाहीर केले आहे. सार्वजनिक व खासगी संस्थांमध्ये १०० टक्के आरक्षण देऊ, जातींची जात आधारित जनगणना करून त्या आधारे प्रशासनात १०० टक्के आरक्षण प्रतिनिधित्व देऊ असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

चौकट
२०१४ पासून मैदानात
बहुजन मुक्ती पार्टीने २०१४ पासून निवडणूक लढवण्यास सुरवात केली. २०१४ मध्ये यशवंत बिर्जे यांनी १७०० मते, २०१९ मध्ये बी. के. पालकर यांनी ६५०० हून अधिक मते मिळवली आहेत तसेच विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार प्रवीण जाधव यांना ७०० मते मिळाली होती.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT