कोकण

कलगीतुरा सन्मानाने शाहीर भारावले

CD

-rat१८p२१.jpg ः
२५N७१५४२
मंडणगड : जननी माता तमाशा मंडळाला सन्मानित करताना मंडळाचे पदाधिकारी.
------
कलगीतुरा सन्मानाने शाहीर भारावले
शाहिरी कलामंडळाचा सोहळा ; दोन जिल्ह्यातील ५३ नाच तमाशा मंडळाचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कलामंडळ रायगड रत्नागिरी (रजि) मंडळाच्या वतीने तमाशा व गौरी गणेश जाखडी नाच ही लोककला जतन करून तिचे रंगामंचावर सादरीकरण करणाऱ्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील ५३ कलामंडळांचा सन्मान सोहळा भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात झाला. ढोलताशांच्या गजरात झालेल्या सन्मानाने शाहीर भारावून गेले.
कलगीतुरा मंडळाच्या वतीने कलाकारांना प्रोत्साहन व ही कोकणची पांरपरिक लोककला अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने वर्षभरात कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळांना सन्मानित करण्यात येते. २०२४-२५ या वर्षामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील १६ तमाशा मंडळांनी चैत्र महिन्यातील देवदेवतांच्या जत्रोत्सावात डबलबारी तमाशा सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. जाखडी नृत्य स्पर्धा व डबलबारी कलगीतुरा कार्यक्रमांमधून २५ तरुण नाचमंडळांनी व १२ चाळीस वर्षावरील वयोगट असणाऱ्या नाचमंडळांनी आपली कला सादर केली. या सर्व कलामंडळांना सन्मापत्र, सन्मानचिन्ह व सर्व कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राम टेंबे, शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी मेंबर विकास गोगावले, माजी जि. प. सदस्य जितू सावंत, सुहेब पाचकर, कलगीतुरा समन्वय समिती अध्यक्ष सुरेश महाबळे, रमेश घडवले, रामचंद्र म्हात्रे, किसन बाटे, प्रकाश कळंबे, शंकर तुरडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुण्यात ड्रेनेज लाईनचं खोदकाम सुरु असताना तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, एकाचा मृत्यू

Himachal Cow Viral Video: गाय से क्या नाता है, गाय हमारी माता है..! ‘त्या’ दोघांच्या कौतुकास्पद कृतीमुळे पुन्हा एकदा झालं सिद्ध

Virar News : मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा अजून एक बळी; छाया कौशिक पुरव यांचा वेळेत हॉस्पिटलमध्ये न पोहचल्यामुळे मृत्यू

Indian Railway: रेल्वे अध्यक्षांच्या मुंबई दौऱ्याचा १७ स्थानकांना फायदा, कोटींच्या खर्चात पुनर्विकास होणार; पहा यादी

Kabutarkhana History: पवित्र परंपरेपासून ते बंद होईपर्यंत...; मुंबईतील कबुतरखान्यांचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर...

SCROLL FOR NEXT