कोकण

आकर्षक गणेशमूर्तींची सावर्डेत विक्री सुरू

CD

- rat२६p३.jpg-
२५N८००५४
सावर्डे ः बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवलेल्या गणेशमूर्ती.

आकर्षक गणेशमूर्तींची सावर्डेत विक्री सुरू
दर चाळीस टक्क्यांनी वाढले; मागणीत घट नाही
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २६ : गणेशोत्सवाची चाहूल लागली असून, सावर्डे परिसरात गणेशमूर्ती विक्रीला सुरुवात झाली आहे. स्थानिक कलाकार आणि मूर्तिकारांनी कुशलतेने तयार केलेल्या विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झालेल्या आहेत. यंदा मूर्तीच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे; मात्र तरीही गणेशमूर्तींच्या मागणीत घट झालेली नाही.
दहिवली खुर्द येथील स्थानिक मूर्तिकार वैभव निर्मळ यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्ती बनवणारे केंद्र असलेल्या पेण (जि. रायगड) येथून पारंपरिक शाडूच्या सुंदर गणेशमूर्ती विक्रीसाठी सावर्डेत आल्या आहेत. येथील डेरवणफाट्याजवळ या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्या एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत आहेत. त्या विविध आकारात असून, पर्यावरणपूरक शाडूमाती व प्लास्टर ऑफ पॅरिस या दोन्ही प्रकारात आकर्षक रंगसंगतीने सजवलेल्या आहेत. एक हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत त्यांची विक्री किंमत आहे. यंदा राज्यशासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींना बंदी घातलेली होती. त्यामुळे कारागिरांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्यास सुरुवात केली. योग्य प्रमाणात माती मळणे, त्याची मूर्ती बनवणे, मूर्ती चांगली सुकवणे मग तिला योग्य रंगसंगती देणे ही कामे खूपच वेळखाऊ आहेत; मात्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवल्यानंतर कारागिरांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरावर परिणाम झालेला आहे. मूर्तीच्या दरामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झाली आहे. जागेचे भाडे, प्रवासखर्च, लाईटभाडे आदी कारणांनी नाइलाजाने दरवाढ करावी लागत असल्याचे निर्मळ यांनी सांगितले.

चौकट
वैभव यांना फाईनआर्टची पदवी
वैभव निर्मळ यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथून फाईनआर्टची पदवी घेतलेली आहे. ते आर्ट डिझाईनिंगचा व्यवसाय करतात. गणेशोत्सवात ते पेण येथील गणेशमूर्ती आणून सावर्डेत विकतात. गतवर्षी त्यांनी सत्तरहून अधिक लहान-मोठ्या गणेशमूर्तींची विक्री केली होती. यंदा त्यांच्याकडे शंभरहून अधिक गणेशमूर्तींची नोंद झाली आहे. त्यांच्या गणेशमूर्तींना भांडुप, नेरूळ, कोंडमळा, दहिवली, असुर्डे, मुंढे, नायशी येथून मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु?

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अर्जुन सुभेदार खऱ्या आयुष्यातील बायकोचा सतत खातो ओरडा, म्हणाते..'किती वाकडं तोंड...'

Video : फूडचं पाऊल ! मराठी अभिनेत्रीची हॉटेल क्षेत्रात एंट्री ; सुबोध भावेच्या हस्ते पार पडलं उद्घाटन

Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात, हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

SCROLL FOR NEXT