
राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी मेळाव्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिला. ठाकरे बंधूंमध्ये जवळजवळ २० मिनिटे चर्चा झाली. दोघांना पुन्हा एकत्र पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठीमेळाव्यापासून युतीसाठी दोन्हीं पक्षाकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने चर्चा सुरु होती पण आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.