कोकण

कुडाळ येथे मंगळवारी पदविका प्रदान सोहळा

CD

कुडाळ येथे मंगळवारी
पदविका प्रदान सोहळा
कुडाळ, ता. ११ ः येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील योगशिक्षक पदविका शिक्षणक्रमाचा पदविका प्रदान समारंभ मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या (कुडाळ) सभागृहात हा कार्यक्रम होईल.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै बी.एड्. कॉलेज या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांपैकी योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम, एमए योगा, एमए शिक्षणशास्त्र, शालेय व्यवस्थापन पदविका, बहिस्थ बीएस्सी हे शिक्षणक्रम सुरू केले आहेत. या केंद्रातील योग शिक्षक पदविका शिक्षणक्रमाच्या २०२३-२४ च्या बॅचचा पदविका प्रदान समारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. २०२३-२४ च्या योग शिक्षक पदविका शिक्षणक्रमाच्या बॅचमधील प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पदविका प्रमाणपत्रे स्वीकारावीत, असे आवाहन केंद्रप्रमुख परेश धावडे, केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT