कोकण

आमच्यावर आली ती वेळ आणखी कोणावर नको

CD

लोगो ः शिरोडा-वेळागर दुर्घटना
----

97957

आमच्यावर आली ती वेळ आणखी कोणावर नको

मणियार कुटुंबाची खंत : सगळ्या किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था उभारा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः शिरोडा-वेळागर येथे झालेल्या दुर्घटनेत कुटुंबातील सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो, हे दुःख मोठे आहे; पण आमच्यासारखे आभाळाएवढे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी शासन, प्रशासन, पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील धोकादायक किनाऱ्यांवर जीवरक्षक, माहिती फलक यांसारखी यंत्रणा उभारावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती मणियार परिवारातर्फे अॅड. परवेझ मुजावर आणि सर्फराज नाईक यांनी शासन आणि प्रशासनाकडे केली.

कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिरोडा-वेळागर येथे ३ ऑक्टोबरला झालेल्या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी प्रचंड सहकार्य केले; पण पोलिस प्रशासन वगळता स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेतील मृत जाकीर आणि फरहान यांचे वडील देखील उपस्थित होते.
बेळगाव येथील कित्तूर कुटुंब आणि त्यांचेच नातेवाईक असलेले पिंगुळी येथील मणियार कुटुंबीय पर्यटनासाठी शिरोडा-वेळागर किनारी गेले होते. तिथे समुद्रात आंघोळ करताना मोठी लाट आली आणि त्यांच्यापैकी ७ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यात पिंगुळी येथील मणियार कुटुंबीयांपैकी फरहान मोहम्मद मणियार (वय २०) आणि जाकीर निसार मणियार (वय १३) यांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनेत स्थानिकांनी खूप सहकार्य केले. समुद्रात वाहून गेलेले मृतदेह किनाऱ्यावर आणण्यासाठी स्थानिकांची खूप मदत झाली. मात्र, प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही, अशी खंत अॅड. मुजावर यांनी व्यक्त केली. यावेळी सर्फराज नाईक, आसिफ नाईक, मृत जाकीरचे वडील निसार मणियार, मृत फरहानचे वडील मोहंमद मणियार, अल्तमश शहा, शारीक शेख, रिझवान मणियार, फैजान मणियार, तौसिफ जमादार, शेहनशहा मकानदार आदी उपस्थित होते.

अॅड. मुजावर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. गोव्याएवढेच पर्यटक येथे भेट देतात. त्यांना सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे जिल्हावासीयांचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. आमच्या कुटुंबातील माणसे समुद्रात उतरली, त्यावेळी समुद्री वादळाची माहिती देणारा कोणताच फलक किनाऱ्यावर नव्हता किंवा या धोक्यांबाबत माहिती देणारा कोणी शासनाचा प्रतिनिधी तिथे नव्हता. आमच्या कुटुंबातील सातजण त्या समुद्रात बुडाले. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी कोणतीही मशिनरी तिथे नव्हती. भगत बंधू, सूरज आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोज आदी स्थानिकांनी आणि मच्छीमार बांधवांनी पर्यटकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबतीत प्रशासन कोणतेही सहकार्य करीत नाही. दोरी, रबरी ट्यूब, इतर मशिनरी असे कोणतेच साहित्य प्रशासन उपलब्ध करून देत नाही. त्या दिवशी तीन मृतदेह सापडले, तर रात्री उशिरा चौथा मृतदेह सापडला. तो मृतदेह पावणेदोन तास समुद्रात दिसत होता. पोलिसांना कळविले, पण काही अडचणींमुळे ते पोहोचू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी मोचेमाडला पाचवा मृतदेह मिळाला. त्याचवेळी एक मृतदेह समोर दिसत होता. त्याला किनाऱ्यावर आणण्यासाठी होडीची मागणी केली, पण होडीची व्यवस्था झाली नाही. तो मृतदेह नजरेदेखत पुन्हा समुद्रात वाहून गेला. नंतर तो विद्रुप अवस्थेत सापडला. वेळीच होडी किंवा मशिनरी उपलब्ध झाली असती, तर मृतदेहाची विटंबना झाली नसती. योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करता आले असते. त्यामुळे वेळीच कोणतीच मदत न मिळाल्याने हा प्रकार घडला.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘घटनेच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे घटनास्थळी आल्या होत्या. तेव्हाही स्थानिकांनीच मदत केली. सातवा मृतदेह केळूसच्या समुद्रात मिळला. अजित नाईक या मच्छीमार बांधवाने याची माहिती दिली. तिथेही होडी मिळाली नाही. अखेर मच्छीमार बांधवांनी निवती पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला. या सर्व प्रक्रियेत पोलिस प्रशासनाने सहकार्य केले; पण ते फक्त सोबत होते. स्थानिक प्रशासनाने त्यांना योग्य मदत पुरवली नाही.’’
.....................
प्रशासनाचे असहकार्य संतापजनक ः नाईक
घटना घडल्यावर आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे सर्फराज नाईक यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमदार नीलेश राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांना घटना सांगितल्यानंतर दुपारी वेंगुर्ले तहसीलदार विच्छेदनस्थळी आले. त्यांनी केवळ घटनेची माहिती घेतली. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, असे नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT