कोकण

कुडाळ येथे १७ ला थेट संवाद मार्गदर्शन

CD

कुडाळ येथे १७ ला थेट संवाद मार्गदर्शन
''चला कुडाळ घडवूया'' उपक्रम; विद्यार्थी, व्यापाऱ्यांना सहभागाचे आवाहन
कुडाळ, ता. १३ :शहरासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ''चला कुडाळ घडवूया'' या उपक्रमांतर्गत थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांबाबत, तर उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी जीएसटी कर प्रणाली या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
या दोन्ही चर्चासत्रांना निवृत्त उपआयुक्त गणेश बाळकृष्ण दळवी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून १७ ला येथे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंदार शिरसाट यांनी ही माहिती दिली. यावेळी एमआयडीसी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व लायन्स पदाधिकारी आनंद बांदिवडेकर, सीए सागर तेली, लायन्स क्लब अध्यक्ष आनंद कर्पे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मनोज वालावलकर, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे आदी उपस्थित होते. यात १७ ला सकाळी सव्वा दहा वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे यूपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धा परीक्षांबाबत विशेष सत्र होईल. यामध्ये परीक्षांची तयारी, अभ्यासपद्धती आणि करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. त्याच दिवशी सायंकाळी सव्वा चार वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे व्यापारी व उद्योजकांसाठी जीएसटी कर प्रणालीवर चर्चासत्र होईल. यामध्ये कर प्रणाली, व्यवसाय वृद्धी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाईल.या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट, कुडाळ तालुका व्यापारी संघटना तसेच एमआयडीसी असोसिएशन, कुडाळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दोन्ही कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून व्यापारी, उद्योजक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंदार शिरसाट यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT