30845
स्त्री ही देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली
वेदिका परब : सावंतवाडीत ‘नारी अभ्युदय’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः स्त्रीशक्ती ही केवळ एका कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आजही काही ठिकाणी महिलांना भेदभाव आणि अन्यायाला सामोरे जावे लागते, ही खेदाची बाब आहे. आजच्या काळात महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, राजकारण आणि व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब यांनी येथे केले.
‘इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी’ हे ब्रीद जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, तुळस या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित ‘नारी अभ्युदय’ महोत्सवात त्या बोलत होत्या. येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सौ. परब यांच्या हस्ते यावेळी कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
या महोत्सवात जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या प्रियांका नाईक, सुपर्णा सांगोरकर, सुजाता पडवळ, श्वेता धाणे, साक्षी तवडेकर, तसेच पंचायत समिती सदस्या अवनी राऊळ, धनश्री मराठे, ऋतिका नाईक, सोनाली नाईक-कुबल, साक्षी नार्वेकर आणि प्रियांका घावड यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय नगरपालिका व नगरपंचायत महिला प्रतिनिधी दीपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, नीलम नाईक, रिया केरकर, काजल कुडाळे, लिना म्हापणकर, नमिता रेडकर, गौरी पारकर, संजना मेहावणकर, क्रांती मधव आणि संध्या प्रसादी यांचाही सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनिता देसाई, मोहिनी रेडकर, स्मिता गावडे, रुपा मुद्राळे, नेहा परब, नुपूर मडकर, मेघना राऊळ, सुजाता गोसावी, भाग्यलक्ष्मी घाटे, अनन्या तेंडोलकर आणि अमृता पाडगावकर या ११ महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ तसेच महिलांसाठी आयोजित ‘सौभाग्य संध्या’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. शुभम धुरी यांनी सूत्रसंचालन केले. वेताळ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.