कोकण

तडजोडीची कास, न्यायाचा श्वास

CD

30879

तडजोडीची कास, न्यायाचा श्वास

लोकअदालतीत ९२१ प्रकरणे निकाली; जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाचदिवशी ९२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १ कोटी ८७ लाख १९ हजार २८३ रुपयांची तडजोड झाली आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सिंधुदुर्ग) अध्यक्ष, डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. सर्व तालुका न्यायालयांत एकूण सात पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमले होते. पॅनेल क्र.१ मध्ये व्ही. एस. देशमुख (जिल्हा न्यायाधीश क्र.१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग) व विधिज्ञ कोमल म्हाडदळकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.२ मध्ये ए. जी. देशिंगकर (सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग) व विधिज्ञ तेजल कुडतरकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी उपस्थित होत्या. या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दिवाणी दावे, फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, वीज देयक प्रकरणे, कौटुंबिक वाद तसेच विविध वादपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता.
यामध्ये पक्षकार व विधिज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांतील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
------
१ कोटी ८७ लाखांचा महसूल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ९२१ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. यामध्ये एकूण १ कोटी ८७ लाख १९ हजार २८३ इतक्या रकमेची तडजोड झाली. समझोता होऊन निकाल झाल्याने सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तडजोडीच्या निकालांविरुद्ध अपील होत नसल्याने वेळेची व पैशांची बचत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT