कोकण

नाणार बॉक्साईट प्रकल्पाला विरोध

CD

नाणार बॉक्साईट प्रकल्पाला विरोध
पंढरीनाथ मयेकर ः बागायतीसह भातशेतीला धोका
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ : नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पामुळे स्थानिकांच्या उपजीविकेची साधने असलेल्या आंबा-काजू बागायती आणि भातशेती धोक्यात येण्यासह प्रदुषणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा शंभर टक्के विरोध असून, नाणार येथे बॉक्साईट उत्खनन होऊ देणार नाही, असा इशारा पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ मयेकर यांनी दिला.
नाणार येथे शासनाने प्रस्तावित केलेल्या बॉक्साईट प्रकल्पाची पुढील महिन्यात जनसुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच प्रकल्पाविरोधात वातावरण तापले असून, मयेकर यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
बॉक्साईट उत्खननामुळे आंबा-काजू बागायती आणि भातशेती धोक्यात येण्यासह विविध प्रकारचे प्रदूषण निर्माण होईल. त्यामुळे नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरातील ग्रामस्थांचा प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. याबाबतचा प्रकल्पविरोधी ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत मांडण्यात आला असून, तो सर्वानुमते मंजूर झाल्याचे मयेकर यांनी सांगितले.
या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार किंवा उत्पन्न मिळणार नाही; उलट सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि पर्यावरणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कोणाच्या हितासाठी आहे? असा सवाल त्यांनी केला. प्रदूषणकारी उद्योगांऐवजी शासनाने कोकणात पर्यावरणपूरक प्रकल्प उभारावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
---
कोट
नाणार येथे मोठ्या प्रमाणात आंबा-काजू बागायती असून, अनेक शेतकरी पारंपरिक भातशेतीही करत आहे. या बागायती-शेती यांसह येथील पर्यावरणावर बॉक्साईट उत्खननाचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यातून, सर्वसामान्यांचे उत्पादन अन् उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले जाणार आहे. त्यामुळे नाणार बॉक्साईट प्रकल्पाला आम्हा सर्व ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे.

-ओंकार प्रभूदेसाई, माजी सरपंच, नाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT