

Chamorshi Hospital Referral Tragedy 21 Year Old Mother And Baby Die In Gadchiroli During Childbirth
esakal
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील एका गरोदर महिलेला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयातून गंभीर अवस्थेत गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना पोटातल्या बाळाने प्रसुतीआधीच जीव गमावला, तर प्रसुतीनंतर मातेनेही उपचाराला प्रतिसाद न देता प्राण सोडले. ही दुर्दैवी घटना रविवार (ता. २३) घडली. जिजा हंसराज सातर (वय २१), रा.जामगिरी, ता.चामोर्शी असे मृत महिलेचे नाव आहे.