गुळवणेत मृदा आरोग्यपत्रिकांचे वाटप
चिपळूण, ता. २४ ः कृषी विभागाच्यावतीने ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत ‘जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२६-२७’ अंतर्गत तालुक्यातील गुळवणे येथे मृदा आरोग्यपत्रिका वाटप आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या वेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीचे आरोग्य आणि शास्त्रोक्त शेती नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गुळवणे येथे झालेल्या कार्यक्रमात मातीच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालाचे (मृदा आरोग्यपत्रिका) उपस्थित शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. या पत्रिकेच्या आधारे जमिनीतील पोषक घटकांची अचूक माहिती घेऊन खतांचा संतुलित वापर व पिकांचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी वहाळ जिल्हा परिषद गट शेतीसमृद्ध व आदर्श बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.