कोकण

वीर सावरकरांचे विचार घराघरांत पोहोचवणार

CD

06880
महाड ः पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्‍थितीत अभियानाची सुरुवात झाली.

सावरकरांची रायगडावरून आठवण
हे गौरवास्पद ः उदय सामंत

‘हर घर सावरकर’ अभियानाची सुरुवात; राज्यभर राबवणार

महाड, ता. २२ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पहिली आरती लिहिली, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण या रायगडावरून केली जात आहे, हे महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी गौरवाची बाब आहे, असे गौरवोद्गार रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी किल्ले रायगड येथे काढले. महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ‘हर घर सावरकर’ अभियानाची सुरुवात यावेळी करण्यात आली.
‘हर घर सावरकर’ समिती ही पुण्यातील सावरकर प्रेमींचा एक समूह असून सावरकरांचे विचार घराघरात पोहोचावेत, या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे. संपूर्ण राज्‍यात वर्षभरात एकूण ७५ कार्यक्रम अभियानांतर्गत राबवले जाणार असून त्‍याची सुरुवात किल्ले रायगडावरून झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात उपस्थितांचे स्वागत करत पालकमंत्री व आमदारांच्या हस्‍ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास त्याचप्रमाणे वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘हर घर सावरकर’ समितीतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उदय सामंत यांनी, ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावरील होणाऱ्या विविध कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान हर घर सावरकर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावरकरांच्या शिवरायांवर रचित आरतीवर त्याचप्रमाणे शिवरायांच्या काही गीतांवर महिला नृत्य कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांना सैनिकी शैलीत मानवंदना दिली. आणि काही शौर्य प्रात्यक्षिके करून उपस्‍थितांची भरभरून दाद मिळवली. महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद त्याचप्रमाणे विशेष पोलिस दल अधिकारी, अनेक प्रशासकीय अधिकारी, शिवप्रेमी व सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT