Raigad News
Raigad News sakal
कोकण

Raigad News: रायगडसाठी १२ जणांचा उमेदवारी अर्ज; जाणून घ्या कोणं आहेत उमेदवार

सकाळ वृत्तसेवा


Alibag News: महायुतीचे उमेदवार सुनील तटकरें यांनी गुरुवारू (ता. १८) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. याचवेळी रायगड लोकसभेच्या जागेसाठी अन्य पाच जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. आजच्या अर्जांसह आतापर्यंत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. शुक्रवारी (ता. १९) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.


तटकरेंच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या सर्व पक्षांचे नेते या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेस उपस्थित होते. अलिबागमधील डीकेटी हायस्कूलसमोर आयोजित केलेल्या सभेसाठी सहा हजार लोक उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ यांच्यासह डॉ. विनय नातू, आमदार योगेश कदम, सूर्यकांत महाडीक, रायगडमधील महायुतीचे आदिती तटकरे, महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रवी पाटील आदी नेते उपस्थित होते. सभेला संबोधित केल्यानंतर सुनील तटकरेंनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला.

राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदावर सुनील तटकरेंबरोबरच डमी अर्ज म्हणून अनिकेत तटकरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच बरोबर आज प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी), पांडुरंग दामोदर चौले, (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज अनामत रक्कमेसह निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. शुक्रवार (ता. १९) ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असून शनिवारी (ता. २०) अर्जांची छाननी होणार आहे. २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर रायगड लोकसभेच्या लढतीची वस्तुस्थिती समोर येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT