कोकण

कोकणात यंदाच्या पर्यटन हंगामातही कोट्यवधीची उलाढाल ठप्प

कोरोनामुळे फटका; व्यावसायिकांना वेगवेगळा फंडा राबवावा लागेल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे (covid-19 patients) संचारबंदीमधील (lockdown) शिथिलता लांबणीवर पडणार हे निश्‍चित आहे. त्याचा परिणाम पर्यटन (tourism) हंगामावर झाला आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली असून मे महिन्याचा हंगाम पूर्ण वाया जाणार आहे. पावसाळ्यातही (rainy season) तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने पर्यटन व्यवसाय सुरू होण्यासाठी दिवाळीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्य शासनाने (state government) संचारबंदी लागू केली असून जिल्हाबंदीही (cerfew) कडक केली आहे. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यात कोकणातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल असतात. कोटीच्या घरात उलाढाल होते. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असतो. यंदा ऐन हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने गतवर्षीप्रमाणेच अवस्था झाली आहे. मार्चच्या (march ending) अखेरीस संचारबंदी लागू झाली. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बंदी उठली आणि पर्यटन व्यवसाय सुरू झाला. ओघ वाढत असतानाच पुन्हा बंदी आली. अनेक लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांनी कर्ज काढून दुरुस्त्या केल्या. ते कर्ज फेडण्यासाठी काय करायचे? हा प्रश्‍न पडला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस ओसरेल, असा अंदाज आहे. तोपर्यंत पर्यटन हंगाम संपलेला असणार. त्यानंतर पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पर्यटन हंगामासाठी या व्यावसायिकांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाळ्यात बंदी उठली तर संचारबंदीमुळे घरात अडकलेले काही पर्यटन फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिकांना वेगवेगळा फंडा राबवावा लागणार आहे.

"संचारबंदीमुळे पर्यटक येत नाहीत. याचा परिणाम होत आहे. बंदी उठण्याची प्रतीक्षा आहे. सध्या एमटीडीसीमधील विविध खोल्यांची देखभाल आणि स्वच्छता ठेवण्यात येत आहे."

- दीपक माने, प्रादेशिक पर्यटन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

Snapchat Love Story: स्नॅपचॅटवर प्रेम ठरले पठ्याने थेट ओडिसा गाठले ; प्रेयसीला घेऊन पठ्ठ्या थेट गावात हजर

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल

Jalgaon Jamod ACB Action : जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कार्यालयातच रंगेहात अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT