Good News : रत्नागिरीत मिळणार Covaxin; 'अशी' करा ऑनलाईन नोंदणी

लसीकरण केंद्रांवर विनाकारण गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Good News : रत्नागिरीत मिळणार Covaxin; 'अशी' करा ऑनलाईन नोंदणी

रत्नागिरी : जिल्ह्यात (ratngiri district) 7 मे ला 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना राज्य शासनाकडून (state government) प्राप्त साठ्यामधून कोव्हॅक्सीन (co-vaccine) लस देण्यात येणार आहे. ती संपूर्णपणे ऑनलाईन (online registration) पध्दतीने नोंदणी करुन घेतलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करण्यात येणार नाही. तरी 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांनी cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रासाठी (vaccination center) नोंदणी केलेली आहे. त्याचठिकाणी लस घ्यावी. कोव्हॅक्सीन लस जिल्ह्यात खालील ठिकाणी दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करु नये. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (aapela from local authority)

Good News : रत्नागिरीत मिळणार Covaxin; 'अशी' करा ऑनलाईन नोंदणी
लसीसाठी कायपण! शहरातील केंद्रं 'हाऊसफुल्ल'; ग्रामीण भागाकडे नागरिकांची धाव

ग्रामीण भागात (villege area) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (primary health center) लस दिली जाईल. तसेच शहरी भागात मंडणगड नूतन हायस्कूल, दापोली सोनी विद्यामंदिर, खेड सहजीवन शाळा, गुहागर पाटपन्हाळे शाळा, चिपळूण नागरिक आरोग्य केंद्र व पोलिस हॉल, संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालय, रत्नागिरी नागरी दवाखाना कोकणनगर, पटवर्धन हायस्कूल व मेस्त्री हायस्कूल, लांजा हायस्कूल व राजापूर हायस्कूल येथे व्यवस्था केली आहे. 7 ते 8 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील पूर्व नियोजीत कोवीशिल्ड लसीची मात्रा ऑनलाईन वेळापत्राप्रमाणे सुरुच राहणार आहेत. त्यात रत्नागिरीत मेस्त्री हायस्कूल, राजापूर ग्रामीण रुग्णालय, गुहागर जीवन शाळा क्र. 1, चिपळूण नगरपालिका दवाखाना, खेड नगरपालिका दवाखाना यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com