कोकण

युती झाली तरी आम्ही एकट्यानेच निवडणूक लढणार- राणे

सकाळन्यूजनेटवर्क

लोकसभा 2019 ः मालवण- जरी युती झाली तरी आम्हाला आता एकट्यानेच निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेसारखे आम्ही लाचार नाही. त्यांच्यासारखे आम्ही कोणासमोर गुडघे टेकणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी गेल्या साडे चार वर्षात जनतेची फसवणूक केल्याने त्यांच्याविरोधात जनतेने 420 चा गुन्हा दाखल करायला हवा. कोकणचा विकास खुंटल्याने येत्या निवडणुकीत स्वाभीमान पक्ष विरोधकांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे केले. 

शिवजयंती उत्सवानिमित्त किल्ल्यावर शिवप्रतिमेचे पूजन राणेंच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील स्वाभीमानची आपली पहिली उमेदवारी नारायण राणे यांनी जाहीर केली. त्यानंतर काल युती झाली. त्यामुळे कोणत्याही युती, आघाडीसाठी न थांबता माझा कोकण जिंकला पाहिजे. यासाठी ही निवडणूक आहे. युती, आघाडीची ही निवडणूक नाही.

राणेंना कोकणचा विकास महत्त्वाचा आहे जो पाच वर्षापासून रखडला आहे. येत्या निवडणुकीत येथील खासदाराला कायमचा मुंबईला पाठविण्याचा विडा कार्यकर्त्यांनी उचलला आहे. त्यानुसार विरोधकांचा कडेलोट येत्या निवडणुकीत केला जाईल. आम्ही कोणासमोरही गुडघे टेकणार नाही. एकटेच निवडणूक जिंकू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार केवळ वेळ घालविण्यासाठी फिरताहेत. मतदार संघासाठीचे ठोस असे कोणतेही नियोजन त्यांच्याकडे नाही. पारंपरिक मच्छीमार, डिझेल परतावा यासारखे प्रश्‍न अद्यापही सुटलेले नाहीत. येत्या निवडणुकीत स्वाभीमानचे आमदार, खासदार निवडून आल्यावर मच्छीमारांसह अन्य जनतेचे प्रश्‍नही मार्गी लावले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

राममंदिर जागेचा प्रश्‍न तसेच नाणार प्रकल्प रद्द, शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली याची कोणतीही नोटिफिकेशन अद्याप आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या शब्दांवर शिवसेनेला गेल्या साडे चार वर्षात खेळविले त्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षानंतरही पुन्हा भाजपसमोर गुडघे टेकले. काल युतीसाठी केवळ पत्रकार परिषद त्यांनी घेतली. महाराष्ट्राला द्यायला त्यांच्याकडे काहीही राहिले नाही. ज्या शिवसेनेने गेल्या पाच वर्षात भाजपचे कपडे फाडले त्यांच्याशीच त्यांनी युती करून सरड्यालाही लाजवेल अशी कृती केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना योग्य तो धडा शिकवेलच असेही राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT