21 athletes guilty including 21 sportsman
21 athletes guilty including 21 sportsman 
क्रीडा

21 ऍथलिट्‌ससह 71 क्रीडापटू दोषी 

सकाळवृत्तसेवा

दिल्ली : भारतातील 71 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले. त्यात 21 ऍथलिट्‌सचा समावेश आहे, असे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) अहवालात म्हटले आहे. भारतातील राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) एकंदर तीन हजार 174 चाचणीचे नमुने घेतले. त्यातील 71 दोषी ठरले. याशिवाय नऊ नमुन्यांची फेरतपासणी आवश्‍यक असल्याचे जागतिक संस्थेने म्हटले आहे. 

नाडा 2015च्या तुलनेत (110) 2017 मध्ये दोषी खेळाडू कमी झाल्याचा दावा करेल; पण 2015 मध्ये चार हजार 734 खेळाडूंची चाचणी झाली होती. नाडाने 2017 मध्ये ऍथलेटिक्‍सचे 502 नमुने घेतले होते. त्यात 21 दोषी ठरले. व्हॉलिबॉल तसेच ज्यूदोतील प्रत्येकी दोन नमुने पॉझिटिव्ह ठरले, तर बॉक्‍सिंगमध्ये चार. स्पर्धा सुरू नसताना बॉक्‍सरचे 270, ऍथलेटिक्‍समध्ये 229 आणि वेटलिफ्टिंगमध्ये 177 चाचणी झाल्या. 

खेळानुसार दोषी नमुने 
खेळ नमुने दोषी 
पॉवरलिफ्टिंग 50 14 
वेटलिफ्टिंग 359 14 
शरीरसौष्ठव 18 9 
फुटबॉल 318 1 
हॉकी 156 1 
कुस्ती 199 4 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT