Ambati Rayudu
Ambati Rayudu 
क्रीडा

संघातून डावलल्याच्या रागातून रायुडूची निवृती

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन वेळा डावलल्याच्या रागातून भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.

अंबाती रायुडू याने चांगली कामगिरी करूनही त्याला विश्वकरंडकासाठी संघात निवडण्यात आले नव्हते. त्यावेळी अष्टपैलू विजय शंकर याला निवडण्यात आले. त्यानंतर शिखर धवन जखमी झाल्यानंतर रायुडू ऐवजी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. आता स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात जखमी विजय शंकरऐवजी मयांक अगरवालला स्थान देण्यात आल्याने रायुडू नाराज होता. अखेर या नाराजीचे रुपांतर निवृत्तीत झाले असून, आज त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

विश्वकरंडक स्पर्धेआधी टीम इंडियाकडून आश्वासक कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूकडे निवड समितीने पूर्णपणे दुर्लक्ष केले. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड होण्यापूर्वी अंबाती रायुडू याचे स्थान नक्की मानले जात होते. प्रत्यक्षात विजय शंकर याच्या रुपाने 3D खेळाडूने त्याचा पत्ता कट केला. तेव्हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक-रिषभ पंत यांच्यात चुरस होती. चौथ्या क्रमांकासाठी शंकर आणि रायुडू असे दोन मोहरे शर्यतीत असल्याचे बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

प्रत्यक्षात विजय शंकरला संधी मिळणे अनपेक्षित होते. त्यानंतर अंबाती रायुडू याने एक ट्विट केले. त्यात त्याने वर्ल्ड कप पाहण्याठी 3D ग्लासेसचा नवा सेट ऑर्डर केल्याचे म्हटले होते. त्याने खिल्ली उडविणाऱ्या इमोजी सुद्धा पोस्ट केल्या होत्या. याद्वारे त्याने प्रसाद यांचा अवमान केला होता. राडुयूने हे ट्वीट आतापर्यंत डिलीट केलेले नाही. त्यावर हजारो लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया उमटल्या तरी त्यातून रायुडू हा हिरो नव्हे तर झिरो असल्याचेच स्पष्ट झाले. आता त्याने थेट निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT