Anurag Thakur Asian Games 2023
Anurag Thakur Asian Games 2023 esakal
क्रीडा

Anurag Thakur : चीनने अरूणाचलच्या खेळाडूंना टार्गेट केले... प्रतिक्रिया तर उमटणारच! अनुराग ठाकुरांनी घेतला मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

Anurag Thakur Asian Games 2023 : चीनने खोडसाळपणा करत अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनमधील हांगथहोऊ येथे होत असलेल्या 19 व्या एशियन गेम्सला उपस्थिती लावण्यासाठी आखलेला आपला चीन दौरा रद्द केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, 'चीन सरकारने भारतीय संघातील अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना टार्गेट करत, त्यांच्याशी दुजाभाव केला आहे असं केंद्र सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यांना चीनमधील हांगझहोऊ येथे होत असलेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यात आडकाठी करण्यात आली आहे.'

भारतीय वुशू संघातील नयेमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या महिला खेळाडू आपल्या ट्रॅवल डॉक्युमेंट डाऊनलोड करू शकल्या नाहीत. त्यांना हांगझहोऊ एशियन गेम्स आयोजक समितीने मान्यता दिली असूनही त्यांना ट्रॅवल डॉक्युमेंट मिळाले नाहीत. भारतीय वुशू संघात एकूण 11 खेळाडू आहेत. इतर खेळाडूंना व्हिसा मिळाल्याने ते हाँगकाँग मार्गे हांगझहोऊला पोहचले.

दरम्यान, चीनच्या एथिक्स समितीचे चेअरमन वेई जिझहाँग यांनी दावा केला की, 'भारतीय खेळाडूंना चीनद्वारे व्हिसा देण्यात आला आहे. भारतीय खेळाडू आधीच चीनमध्ये दाखल झाले आहे. चीनने कोणाचाही व्हिसा नाकारलेला नाही. दुर्दैवाने या खेळाडूंनी व्हिसा स्विकारला नाही.'

'मला नाही वाटत की ही OCA ची समस्या आहे. कारण चीनने सर्व खेळाडूंनी चीनमध्ये येऊन स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठीच्या सर्व गोष्टी केल्या आहेत. त्यांना व्हिसा देण्यात आला आहे हे स्पष्ट आहे.'

यावर्षी जुलै महिन्यात चीनच्या दुतावासाने अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना स्टॅपल्ड व्हिजा जारी केला होता. हे खेळाडू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स खेळण्यासाठी चेंगडू येथे जाणार होते. चीनच्या या निर्णयाच्या विरोधात भारताच्या संपूर्ण वुशू संघाने स्पर्धेतून माघार घेतली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT