saina nehwal
saina nehwal 
क्रीडा

बॅडमिंटनपटू साईना नेहवाल अडकणार विवाहबंधनात

वृत्तसंस्था

हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जवळच्या 100 लोकांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. ''दोन्ही परिवार बऱ्याच दिवसापासून या लग्नाची तयारी करत आहेत. आता त्यांनी तारीख निश्चित केली असून 16 डिसेंबरला हा विवाह सोहळा पार पडेल,'' अशी माहिती या जोडप्याच्या कुटुंबियांनी दिली. 

साईना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. ते नेहमी श्रीकांत किदांबी, एच एस प्रणॉय आणि गुरुसाईदत्त यांच्यासह एकत्र फिरत असत. 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कश्यपने साईनासोबतचे नाते हे फक्त मैत्रीचे असल्याचे वारंवार सांगितले आहे. 

साईना आणि कश्यप यांची भेट 2005मध्ये गोपीचंद यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आल्यावर झाली होती. लंडन 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत यांच्या नात्याबद्दल चर्चा होण्यास सुरवात झाली होती मात्र, यावर्षी गोल्ड कोस्ट स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यावर साईनाने कश्पचे आभार मानत या विजयात त्याचा मोठा वाटा असल्याचे म्हटले होते. यानंतरच त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. 

काही दिवसांपूर्वी साईनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. साईना आणि पी. कश्यप यांच्या आधी सानिया-शोएब, दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान हे स्टार खेळाडू विवाहबंधनात अडकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT