IPL 2023 CSK Playing 11 GT vs CSK
IPL 2023 CSK Playing 11 GT vs CSK  esakal
क्रीडा

IPL 2023 CSK Playing 11 : स्टोक्स 16.25 कोटी घेणार अन् फक्त बॅटिंग करणार! CSK ची पहिल्याच सामन्यात कसरत

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 CSK Playing 11 GT vs CSK : आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरूवात ही गतविजेत्या गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याने होणार आहे. 31 मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र तो सामना खेळण्यासाठी फिट झाला आहे. याबाबतची माहिती सीएसकेचे सीईओ केसी विश्वनाथन यांनी दिली.

मात्र धोनीच्या रूपाने जरी सीएसकेसाठी आनंदाची बातमी मिळाली असली तरी त्यांची प्लेईंग 11 निवडतानाची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सीएसकेने तब्बल 16.25 कोटी रूपये खर्चून संघात घेतले. मात्र आता बेन स्टोक्स हा फक्त फलंदाजी करणार आहे. त्यामुळे सीएसकेसमोर आता गोलंदाजीतील स्टोक्सची उणीव भरून काढण्यासाठी कोणत्या वेगवान गोलंदाजाला संधी द्यायची ही डोकेदुखी निर्माण झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी गेला आयपीएल हंगाम फारसा तांगला गेला नव्हता. त्यांना लीग स्टेजमध्ये नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. चेन्नईसाठी हा आतापर्यंतचा सर्वात वाईट हंगाम ठरला होता. त्यांना 14 सामन्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला तर 10 सामने गमावण्याची वेळ आली.

यंदाच्या हंगामात सीएसकेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर 16.25 कोटी रूपयांची बोली लावत त्याला आपल्या गोटात खेचले होते. आता स्टोक्सवर या बोलीला साजेशी कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे.

स्टोक्स हा चेन्नईसाठी मधल्या फेळीत खेळणार आहे. रविंद्र जडेजा, मोईन अली, महेंद्रसिंह धोनी यांच्या साथीला आता सोक्स आल्याने चेन्नईच मधील फळी तगडी झाली आहे.

गुजरात टायटन्सविरूद्ध सीएसकेची अशी असेल प्लेईंग 11 :

डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, दीपक चाहर, ड्वेन प्रेटोरियस, सिमरजीत सिंग / तुषार देशपांडे.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT