Conway-Catch-Video
Conway-Catch-Video 
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनवेने थेट हवेत घेतली झेप अन्...

विराज भागवत

सीमारेषेवर अतिशय वेगाने कॉनवे धावत आला (NZ vs PAK Video)

PAK vs NZ, T20 World Cup2021: पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने टीम इंडियापाठोपाठ न्यूझीलंडलाही पराभूत केले. दोन सलग विजयांसह पाकिस्तानचा संघ ४ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पोहोचला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने १३४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था ५ बाद ८७ अशी होती. तेथून पुढे अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अली यांनी दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकचा विजय झाला असला तरी न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेचा कॅच विशेष गाजला.

१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम ९ धावांवर आणि फखर झमान ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद हाफीज हे दोघे खेळत होते. हाफीजने धावगती वाढवण्याच्या नादात एका हवाई फटका खेळला. पण डेवॉन कॉनवे सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. कॉनवेने धावत जाऊन अत्यंत चपळाईने तो झेल टिपला. कॅच घेताना तो अक्षरश: हवेत होता. त्याने झकास झेल टिपत हाफीजला ११ धावांवर माघारी धाडले.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, न्यूझीलंडकडून डॅरल मिचेल आणि डेवॉन कॉनवे या दोघांनी प्रत्येकी २७ धावा केल्या. तर केन विल्यमसनने २५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर रिझवान सर्वाधिक ३३ धावांची खेळी करून गेला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी शोएब मलिक (२६*) आणि असिफ अली (२७*) या दोघांनी नाबाद ४८ धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT