Venkatesh Prasad Reaction | IND v PAK: "काय निर्लज्ज माणूस आहे"; वकार युनिसवर व्यंकटेश प्रसाद संतापला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh-Prasad-Waqar-Younis

Waqar Younis Statement : वकार युनिसने भारत-पाक सामन्यानंतर केलं वादग्रस्त विधान

T20 WC: "निर्लज्ज माणूस"; वकारवर व्यंकटेश प्रसाद संतापला

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून विजय मिळवला. गेल्या १२ सामन्यात भारताने पाकला धूळ चारली होती. पण रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवून भारताला दणका दिला. सलामीवीर मोहम्मद रिझवान याने दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनिस याने एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाल्यावर अखेर आज त्याने याबद्दल माफी मागितली.

हेही वाचा: T20 WC: पाकिस्तानविरूद्ध विराट 'इथे' चुकला- जहीर खान

नक्की काय झालं?

सलामीवीर मोहम्मद रिझवानने सामना संपल्यानंतर मैदानावरच नमाज पठण केले. याबाबत बोलताना पाकचा वकार युनिस म्हणाला होता की, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी उत्तम खेळ तर केलाच. आजूबाजूला अनेक हिंदू असताना त्यांच्यासमोर रिझवानने नमाज पठण केले, ही गोष्ट खास आहे.

वकारच्या या विधानानंतर त्याच्यावर काही फॅन्सने टीका केली. भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यानेही त्याच्या या वक्तव्याचा निषेध केला. "हिंदूमध्ये उभं राहून नमाज पठण केलं ही गोष्ट खूपच खास आहे, असं वकार युनिसचं वक्तव्य आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे खेळामध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवणे आणि त्याला एका वेगळ्याची वाईट उंचीवर नेणं असं होतं. काय निर्लज्ज माणून आहे", असं प्रसादने ट्वीट केलं.

हेही वाचा: T20 WC: पाकची माजी कर्णधार म्हणते, "टीम इंडिया..."

दरम्यान, पाकिस्तानने भारतानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघालाही पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहे.

Web Title: Waqar Younis Namaz Statement Creates Controversy Venkatesh Prasad Slams Jihadi Approach Ind Vs Pak Vjb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top